(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
ऐश्वर्या राय बच्चन नुकतीच मुलगी आराध्या बच्चनसोबत दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार म्हणजेच SIIMA मध्ये सहभागी होताना दिसली. या फंक्शनमध्ये आराध्या खासकरून तिच्या आईसाठी चीअरलीडर बनली. आराध्याचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत ज्यात ती सतत तिच्या आईला प्रोत्साहन देताना दिसत आहे.
आराध्याचे केले कौतुक
ऐश्वर्या अवॉर्ड घेऊन स्टेजवरून खाली येताच तिची मुलगी धावत आली आणि तिला मिठी मारताना या व्हिडीओमध्ये दिसली आहे. पुरस्कार जिंकल्यानंतर ऐश्वर्याने या खास कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल आपल्या मुलीचे मंचावरून आभारही मानले. यासोबतच सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची मुलगी गर्दीत एका व्यक्तीच्या पायांना स्पर्श करताना दिसत आहे. आराध्याचा हा व्हिडीओ पाहून सर्वांना आश्चर्य वाटले की, अमिताभ बच्चन यांच्या नातीने ज्याच्या पायाला स्पर्श केला ती व्यक्ती कोण आहे. यासोबतच लोक आराध्याच्या कौतुकही करत आहेत.
ऐश्वर्याच्या मुलीने अभिनेत्याच्या पायाला केला स्पर्श
SIIMA अवॉर्ड्समध्ये, ऐश्वर्या राय बच्चनला मणिरत्नमच्या महाकाव्य ‘पोनियिन सेल्वन 2’ मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. यादरम्यान ऐश्वर्या तिला मदत करणाऱ्या चियान विक्रमचा हात धरून स्टेजवरून खाली येताना दिसली. आराध्याने तिच्या आईला मिठी मारली आणि दोघेही आपापल्या जागी जात असताना साऊथ स्टार डॉ. शिवा राजकुमार अभिनेता चियान विक्रमला भेटायला येतो. त्याला पाहून ऐश्वर्याही त्याला भेटायला येते आणि दोघेही बोलू लागतात. दरम्यान, ऐश्वर्या अभिनेत्याची आराध्याशी ओळख करून देते नंतर आराध्या प्रथम त्यांना हात जोडून नमस्कार करते आणि नंतर त्याच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेते. आपल्या मुलीच्या या हावभावाने ऐश्वर्याही प्रभावित झालेली या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
हे देखील वाचा- राशी खन्ना आणि विक्रांत मॅसी स्टारर ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटाचे पहिले पोस्टर केले रिलीज!
आराध्याच्या चांगल्या संगोपनाबद्दल अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबाचे कौतुक केले. एका युजरने कमेंट केली की, “मुलीला मोठ्यांचा आदर करण्याचे संस्कार दिले गेले आहेत.” तर दुसऱ्याने टिप्पणी केली, “ही मूल्ये बच्चन कुटुंबातूनच आली आहेत.” तिसऱ्याने लिहिले: “काय पालकत्व.” असे लिहून चाहत्यांनी या व्हिडिओला चांगलाच प्रतिसाद दिला आहे.