(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चनला चाहत्यांनी मोठ्या पडद्यावर आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहिले अभिनय करताना पहिले आहे. अनेक वेगवेगळी पात्र साकारून त्याने आपले अभिनय कौशल्य प्रेक्षकांच्या समोर आणले आहे. पण आता अभिनेता वडिलांच्या भूमिकेत दिसणार असून तो आपल्या मुलीला वाढवताण आणि तिची सगळी स्वप्न एकटा पूर्ण करताना दिसणार आहे. घूमर या चित्रपटापासूनच चाहते अभिषेक बच्चनला चित्रपट आणि मालिकांमध्ये पुन्हा पाहण्यासाठी उत्सुक होते. आता त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटात तो सिंगल वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे.
अभिषेक बच्चनच्या नवीन चित्रपटाची घोषणा
अभिषेक बच्चनचा आगामी चित्रपट बी हॅप्पी ची घोषणा २१ सप्टेंबर रोजी करण्यात आली आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले असून, या पोस्टरवरील चित्रात अभिषेक बच्चन त्याच्या ऑन-स्क्रीन मुलीसोबत हवेत उडताना दिसत आहे. हा चित्रपट वडील आणि मुलीच्या नात्याला इमोशनल टच देणार असल्याचे पोस्टर पाहून स्पष्ट होत आहे. या चित्रपटाची कथा आणि अभिषेकचे नवे पात्र पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.
चित्रपट कधी आणि कुठे प्रदर्शित होणार चित्रपट
अभिषेक बच्चनचा बी हॅप्पी कधी रिलीज होणार आहे, त्याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, हा चित्रपट कुठे प्रदर्शित होणार आहे, याची माहिती मिळाली आहे. हे चित्रपटगृहांऐवजी OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर स्ट्रीम केले जाणार आहे. चित्रपटाच्या घोषणेनंतर चाहते आणि सेलिब्रिटी सोशल मीडियावर कमेंट बॉक्समध्ये आपली उत्सुकता व्यक्त करत आहेत. हा चित्रपट चित्रपगृहात दाखल न होता थेट OTT प्लॅटफॉर्म प्रदर्शित होणार आहे.
हे देखील वाचा- जागतिक स्टार नोरा फतेही IIFA 2024 च्या स्टेजवर परफॉर्म करण्यासाठी सज्ज!
काय आहे बी हॅप्पी चित्रपटाची कथा?
बी हॅप्पी ही एका अविवाहित वडिलांची कथा आहे आणि आपल्या मुलीला भारतातील सर्वात मोठ्या नृत्य रिॲलिटी शोमध्ये परफॉर्म करण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करण्यात मदत करण्याचा त्याचा सुंदर प्रवास या चित्रपटामध्ये दाखवला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय कन्या दिनाच्या एक दिवस आधी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर रेमो डिसूझा यांनी केले आहे.