(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी चित्रपट विश्वातील महागुरू सचिन पिळगावकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत मोठ्या प्रमाणात काम करून प्रसिद्धी मिळवली आहे. बालकलाकार म्हणून इंडस्ट्रीत सचिन पिळगावकर यांनी प्रवेश केला, आणि त्यांच्या पहिल्या चित्रपटानंतर त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. ते नेहमीच त्यांच्या मुलाखतींमधून त्यांच्या कारकिर्दीतील अनेक किस्से सांगताना दिसले आहेत. अनेक वेळा ते या किस्स्यांमुळे चर्चेत आले आहेत. आता नुकतीच त्यांनी एका मोठ्या कार्यक्रमा दरम्यान सचिन पिळगावकर उर्दू भाषेतबद्दल बोलताना दिसले, त्यांच्या ‘मी उर्दूसोबत झोपतो’ यांच्या या विधानामुळे ते चर्चेत आले, आणि आता या विधानावर नाना पाटेकर बोलताना दिसले आहेत.
बॉलीवूड Drama Queen चा मोठ्या उत्साहात ४७ वा वाढदिवस साजरा, जवळच्या व्यक्तीने दिले मोठे सरप्राईज
एका कार्यक्रमात उर्दू भाषेबद्दल बोलताना महागुरूंनी त्यांची मातृभाषा मराठी असली तरी ते अजूनही उर्दू भाषेत आपले विचार व्यक्त करतात असे ते म्हणाले होते. त्यावेळी त्यांचे विधान व्हायरल झाले. परंतु, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनीही असेच एक विधान केले आहे. नाना पाटेकर यांच्या विधानामुळे चाहते थोडे नाराज झालेले दिसत आहेत. कारण असे की ज्याप्रमाणे सचिन पिळगावकर यांनी उर्दू भाषेवर आधारित विधाने केली, त्याचप्रमाणे नाना पाटेकर यांनी मराठी भाषेवर आधारित विधाने केली आहे.
नाना पाटेकर नक्की काय म्हणाले?
नाना पाटेकर एका कार्यक्रमासाठी एमजीएम विद्यापीठात उपस्थित राहिले होते. त्यावेळी त्यांनी हिंदी भाषेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर आपण सर्वांना (इतर राज्यांतून आलेल्या विद्यार्थ्यांना) समजावं म्हणून हिंदीत संवाद साधल्याचं नानांनी स्पष्ट केलं. नाना पाटेकर म्हणाले की, “मराठी मध्ये बोलताना शब्द शोधावे लागत नाहीत. ते सहज येतात, पटकन तोंडी येतात… कारण, मला स्वप्न ही मराठीमध्ये पडतात. ती माझी मातृभाषा आहे…”, असं नाना म्हणाले. नाना पाटेकर यांनी केलेलं हे वक्तव्य सध्या जोरदार व्हायरल होत आहे. नाना पाटेकरांनी बोलताना कुठेही सचिन पिळगांवकरांचा उल्लेख केलेला नाही, तरीसुद्धा अनेकांनी त्यांचं हे वक्तव्य सचिन पिळगांवकरांच्या उर्दू भाषेतील वक्तव्याशी जोडलं आहे.
“Dhurandhar”ने मोडला १७ वर्षांचा रेकॉर्ड! दोन-तीन नाही तर, तब्बल एवढ्या तासांचा असणार चित्रपट
तसेच, सचिन पिळगांवकरांचं उर्दू भाषेबाबतचं वक्तव्य जोरदार व्हायरल झाले होते. लोकांनी कंमेंट करून खूप प्रतिसाद देखील दिला. त्यावेळी अनेकांनी त्यांना ट्रोल देखील केले, तर अनेकांनी त्यांची बाजू घेत उर्दू भाषेचा गोडवा समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला. पण, आता नानांनी तसंच वक्तव्य केल्यामुळे चर्चांना उधाण आल्याचे दिसत आहे. नाना पाटेकरांनी कुणाचंही नाव न घेता, मराठी भाषेबाबत अभिमान व्यक्त करताना केलेलं वक्तव्य आता नेटकऱ्यांकडून थेट सचिन पिळगांवकरांच्या उर्दू भाषेच्या वक्तव्याशी जोडले जात आहे.






