(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचा आज ८१ वा वाढदिवस आहे. अभिनेत्याचा जन्म 11 ऑक्टोबर 1942 रोजी उत्तर प्रदेशच्या अलाहाबाद इथे झाला. गेली अनेक वर्ष अमिताभ बच्चन मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहे. पण हे सगळं करताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. बॉलिवूडमधील बिग बी आजही ‘अँग्री यंग मॅन’ या नावानेही ओळखले जात आहेत. शहेनशाह, महानायक अशा अनेक नावांनी त्यांची ओळख या सिनेमासृष्टीत गाजत आहे.
आज महानायक अमिताभ बच्चन यांना बॉलीवूड कलाकारांसह अनेक चाहते त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव करत आहे. तसेच अश्याच त्यांच्या एका चाहत्यांने बॉलीवूड मधील अभिनेता मनीष पॉलने त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांच्यासाठी अप्रतिम पत्र लिहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्याने पोस्ट शेअर करत लिहिले की, “वाढदिवसाच्या शुभेच्छा सर आम्हाला नेहमी प्रेरणा दिल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला खूप खूप प्रेम मी तुमचा किती मोठा चाहता आहे तुम्हाला ते माहित आहे.” असे लिहून अभिनेत्याने ही पोस्ट शेअर केली आहे.
मनीष पॉलने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. अमिताभ बच्चन यांनी मनीष पॉलवर खूप प्रभाव टाकला आहे आणि अनेक प्रसंगी अभिनेत्याने सुपरस्टारबद्दलचे प्रेम उघडपणे व्यक्त केले आहे यात शंका नाही. मनीष पॉल दरवर्षी दिवाळीपूर्वी अमिताभ बच्चन यांचे आशीर्वाद घेतात. अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये नमूद केले होते की हा त्याच्यासाठी एक विधी आहे आणि ज्येष्ठ सुपरस्टारला भेटल्यानंतर त्याला “जादुई” वाटते असे देखील अभिनेता म्हणाला आहे. अमिताभ बच्चन यांच्याकडून मिळालेली सकारात्मकता आणि ऊर्जा अतुलनीय असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. मनीष पॉल आणि अमिताभ बच्चन या दोघांचेही अनेक जुने फोटो अभिनेत्याने शेअर केले आहेत.
हे देखील वाचा- निकिता दत्ता शाहरुख खानची खरी फॅन! अभिनेत्रीने ‘मेहंदी लगा कर रखना’ या लोकप्रिय गाण्यावर केले नृत्य
कामाच्या आघाडीवर, अभिनेता मनीष पॉल 2025 मध्ये रिलीज होणाऱ्या धर्मा प्रॉडक्शनच्या ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ या चित्रपटात वरुण धवनसोबत दिसणार आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर, रोहित सराफ, सान्या मल्होत्रा आणि अक्षय ओबेरॉय यांच्याही भूमिका आहेत. डेव्हिड धवनच्या आगामी अनटाइटल्ड कॉमेडी एंटरटेनरमध्ये तो एक मनोरंजक पात्र साकारताना दिसणार आहे, जिथे तो पुन्हा एकदा वरुण धवनसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.