(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थने गेल्या आठवड्यात अचानक लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले. या दोघांनी वानपर्थी येथील 400 वर्षे जुन्या श्री रंगनायकस्वामी मंदिरात लग्न केले आणि 16 सप्टेंबर 2024 रोजी सोशल मीडियावर लग्नाचे फोटो अपलोड करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. आता लग्नानंतर हे दोघे पहिल्यांदाच मुंबईत स्पॉट झाले आहेत. लग्नानंतर आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ १९ सप्टेंबरच्या रात्री मुंबईला परतले. दोघेही मुंबई विमानतळावर एकत्र दिसले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अदिती-सिद्धार्थ रोमँटिक अंदाजात दिसले
व्हिडिओमध्ये अदिती आणि सिद्धार्थ एकमेकांचा हात धरून विमानतळावरून बाहेर पडताना दिसत आहेत. पापाराझी त्यांना त्यांच्या लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत आणि अभिनेत्री त्यांचे आभार मानत आहे. दोघांनीही चाहत्यांना नमस्कार केला. यादरम्यान अदिती गुलाबी रंगाच्या सूटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. अभिनेत्री अतिशय सध्या लुकमध्ये दिसत आहे. सिद्धार्थबद्दल बोलायचे झाले तर तो कॅज्युअल लूकमध्ये दिसला. त्याने जीन्स, शर्ट, कॅपसह स्नीकर्स घातले होते. दोघांचा हा व्हिडिओ चाहत्यांना आवडला आहे.
सिद्धार्थ-अदिती तीन वर्षांपासून डेट करत होते
आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ यांची पहिली भेट महा समुद्रम चित्रपटाच्या सेटवर झाली आणि येथूनच त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली. दोघांचे पहिल्या नजरेत प्रेम झाले होते. एका मुलाखतीत अभिनेत्याने सांगितले होते की, तो अदितीच्या पहिल्या नजरेतच प्रेमात पडला होता. तीन वर्षे गुपचूप रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर या दोघांनी यावर्षी मार्चमध्ये एंगेजमेंट केली आणि आता दोघेही पती-पत्नी बनले आहेत.
हे देखील वाचा- कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ची हरियाणा निवडणुकीमुळे तारीख ढकलली पुढे, कोर्टाने सीबीएफसीला फटकारले!
अदितीचे पहिले लग्न अभिनेता सत्यदीप मिश्रासोबत झाले होते, त्यानंतर ती २०१३ मध्ये वेगळी झाली होती. त्याचवेळी सिद्धार्थचे पहिले लग्न मेघना नारायणसोबत झाले होते. 2007 मध्ये त्यांचे नाते संपुष्टात आले.