(फोटो सौजन्य- Xअकाउंट)
किरण रावची ‘लापता लेडीज’ ऑस्करमध्ये भारताची अधिकृत प्रवेशिका ठरली आहे. आता अवघ्या दोन दिवसांनी हा मान मिळवण्यात आणखी एका हिंदी चित्रपटाला यश आले आहे. 2025 मध्ये होणाऱ्या ऑस्करसाठी यूकेने संध्या सुरीचा ‘संतोष’ चित्रपट सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म म्हणून निवडला आहे. या चित्रपटात भारतीय अभिनेत्री शहाना गोस्वामी आणि सुनीता राजवार मुख्य भूमिकेत आहेत.
अशी झाली चित्रपटाची निवड?
डेडलाइन वेबसाइटच्या अहवालानुसार, यूके सबमिशन्स निवडण्यासाठी अमेरिकन अकादमीने नियुक्त केलेल्या बाफ्टा या संस्थेने चित्रपटाची निवड केली आहे. अन सरटेन रिगार्ड म्हणून या वर्षीच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचा प्रीमियर झाला. आणि आता या चित्रपटाची ऑस्कर 2025 मध्ये निवड करण्यात आली आहे.
संतोषची यूकेमधून निवड करण्यात आली आहे. कारण, हा चित्रपट तेथे मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित झाला होता आणि त्याला ब्रिटीश निर्मात्यांचा पाठिंबा दिला होता. या चित्रपटाची निर्मिती माईक गुड्रिज, जेम्स बोशर, बाल्थाझार डी गॅने आणि ॲलन मॅकलेक्स यांनी केली आहे. Ama Ampadu, Eva Yates, Diarmid Scrimshaw, Lucia Haslauer आणि Martin Gerhard हे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.
हे देखील वाचा- २२ वर्षांचा चंद्र प्रकाश ठरला KBC 16 सीझनचा पहिला करोडपती, ७ करोडच्या प्रश्नावर घेतली माघार?
काय आहे ‘संतोष’ चित्रपटाची कथा?
संध्या सुरी यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला हा चित्रपट एक अन्वेषणात्मक थ्रिलर चित्रपट आहे. चित्रपटाची कथा उत्तर भारतातील एका गावावर आधारित आहे. नवविवाहित असलेली एक महिला आहे. पण काही काळानंतर पतीचा मृत्यू होतो आणि पत्नीला पोलीस हवालदाराची नोकरी मिळते. तिला एक केस मिळते जिथे तिला एका अल्पवयीन मुलीच्या हत्येची उकल करायची असते. ती या प्रकरणाच्या चौकशीत गुंतते. या चित्रपटात शहाना गोस्वामीने संतोषची भूमिका साकारली आहे.