(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
रेड आणि रेड २ च्या प्रचंड यशानंतर, अजय देवगण आता “रेड ३” चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अभिनेत्याचा या चित्रपटाचा तिसरा भाग आता लवकरच येणाऱ्या नवीन वर्षात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अजयने पुन्हा एकदा दिग्दर्शक राजकुमार गुप्ता यांच्यासोबत काम केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून निर्माते रेड ३ च्या स्क्रिप्टवर काम करत आहेत. चाहत्यांनी अजय देवगणच्या या क्राइम थ्रिलर फ्रँचायझीवर खूप प्रेम केले आणि त्याला भरभरून प्रतिसाद देखील दिला. म्हणूनच निर्माते आता त्याच्या तिसऱ्या भागाचा विचार करत आहेत.
पिंकव्हिलाच्या एका अहवालानुसार, चित्रपटाची पटकथा गेल्या अनेक महिन्यांपासून बनवली जात आहे. निर्माते पुढील वर्षाच्या सुरुवातीला रेड ३ चे चित्रीकरण सुरू करण्याची योजना आखत असल्याचे समजले आहे. अहवालात असे म्हटले आहे की तिसरा भाग पहिल्या दोन भागांपेक्षा अधिक शक्तिशाली असेल. आणि अनेक रहस्य चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे.
हार्दिक पांड्याने गुपचूप उरकला साखरपुडा? कथित गर्लफ्रेंड महिका शर्मासोबतच्या पोस्टने वेधले लक्ष
‘रेड ३’ हा चित्रपट मोठ्या प्रमाणात बनवला जाणार आहे. अजय देवगणला पहिल्या दोन भागांपेक्षा वेगळी परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. अजय देवगण सध्या अनेक चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे, त्याचे सध्याचे प्रकल्प पूर्ण होताच निर्माते शूटिंग सुरू करतील अशी बातमी समोर आली आहे. त्यांनी सध्या जून २०२६ च्या आसपासची तारीख निश्चित केली आहे.
रेड आणि रेड २ ची कमाई
रेड फ्रँचायझीमधील पहिला चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला. अजय देवगणने आयकर अधिकाऱ्याची भूमिका केली होती आणि त्याच्या भूमिकेला आणि चित्रपटाच्या कथानकाला चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने जगभरात १५० कोटींपेक्षा जास्त कमाई केली. २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या रेड २ लाही चांगला प्रतिसाद मिळाला. कथानक बदलले असले तरी, अजयची भूमिका तीच राहणार आहे. यावेळी, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २०० कोटींचा टप्पा ओलांडला आणि जगभरात २३५ कोटींपेक्षा जास्त कमाई केली.
अजय देवगणचे आगामी चित्रपट
अजय देवगणचा “दे दे प्यार दे २” हा चित्रपट नुकताच बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. तसेच अभिनेत्याकडे “धमाल ४” हा चित्रपट देखील आहे, जो पुढील वर्षी मार्चमध्ये प्रदर्शित होणार आहे. शिवाय, अजय पुढील वर्षी रोहित शेट्टीच्या “गोलमाल ५” वरही काम सुरू करणार आहे.






