Akshay Kumar (फोटो सौजन्य- Instagram)
सध्या बॉलीवूड स्टार अक्षय कुमारचे चित्रपट सुपरहिट होताना दिसत नाही आहेत. 2023 मध्ये अभिनेत्याचा ‘OMG 2’ चित्रपट यशस्वी ठरला होता. हा चित्रपरत प्रेक्षकांना देखील प्रचंड आवडला होता. परंतु, या चित्रपटानंतर त्याचे आलेले सर्व सिनेमे फारसे चांगले चालले नाहीत. ‘सरफिरा’ देखील अभिनेत्याच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही.
तर, ‘सराफिरा’नंतर अक्षय कुमारचे संपूर्ण लक्ष आगामी चित्रपटांवर आहे. त्याचा ‘खेल खेल में’ हा चित्रपटही पुढील महिन्यात प्रदर्शित होत आहे. अक्षय कुमार सध्या कुटुंबासोबत सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहे. नुकतेच या सुट्टीचा आनंद लुटताना अभिनेता कविता वाचन करत असल्याचे समोर आले आहे. अक्षय कुमारने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक सुंदर कविता शेअर केली आहे. ती वाचून चाहतेदेखील भावुक झाले आहेत.
अक्षय कुमारने शेअर केली कविता
अक्षय कुमारने अलीकडेच एका पोस्टद्वारे सांगितले की, तो सध्या सुट्टीवर आहे आणि कविता वाचण्यात वेळ घालवत आहे. एक सुंदर कविताही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. जी चाहत्यांना आवडली आहे.
आंखों में रहा, दिल में उतर कर नहीं देखा…
कश्ती के मुसाफिर ने समंदर नहीं देखा!
बेवक्त अगर जाऊंगा, सब चौंक पड़ेंगे…
एक उम्र हुई, दिन में कभी, घर नहीं देखा!
जिस दिन से चला हूं, मेरी मंजिल पे नजर है…
आंखों ने कभी मील का पत्थर नहीं देखा!
ये फूल मुझे कोई विरासत में मिले हैं?
तुमने मेरा कांटों भरा बिस्तर नहीं देखा!
यारों की मोहब्बत का यकीन कर लिया मैंने…
फूलों में छुपाया हुआ खंजर नहीं देखा!
अभिनेता अक्षय कुमारने कॅप्शनमध्ये लिहिले की, “मी सुट्टीवर आहे आणि मला कविता वाचावे असे वाटले. बशीर बद्र साहब यांची ही उत्कृष्ट कविता सापडली. किती छान कविता लिहिली आहे.” अक्षयचा आगामी चित्रपट ‘खेल खेल में’ ऑगस्टमध्ये प्रदर्शित होत आहे. या कवितेशी त्याच्या चित्रपटाचा काही संबंध असण्याची शक्यता आहे.
कोण आहेत बशीर बद्र साहब?
सय्यद मुहम्मद बशीर उर्फ बशीर बद्र यांची गणना देशातील महान कवींमध्ये केली जाते. ८९ वर्षांचे बद्र साहेब हे आघाडीचे उर्दू कलाकार असून ते प्रामुख्याने गझल लिहिण्यासाठी ओळखले जातात. मुशायराची शान असलेले बशीर बद्र हे बिहार उर्दू अकादमीचे अध्यक्षही राहिले आहेत. 1999 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कामाच्या आघाडीवर, बॉलीवूड स्टार अक्षय कुमारचा ‘खेल खेल में’ हा कॉमेडी चित्रपट ‘स्त्री 2’ आणि ‘वेद’ सोबत १५ ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होत आहे. ‘सिंघम अगेन’, ‘स्काय फोर्स’, ‘जॉली एलएलबी 3’, ‘हाऊसफुल 5’ आणि ‘कनप्पा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तो दिसणार आहे. या अभिनेत्याचे सगळे ब्लॉकब्लस्टर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून, चाहत्यांची आतुरता वाढली आहे.