(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
दक्षिणेतील अभिनेता वरूण तेज आणि लावण्या त्रिपाठी यांच्या घरी चिमुकल्या राजकुमाराचे आगमन झालं आहे. या जोडप्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. वरुण आणि लावण्या हे जोडपे 2 वर्षांनी आई वडील झाले आहेत. सोशल मीडियावर या जोडप्याने त्यांच्या मुलासोबत ब्लॅक अँड व्हाइट फिल्टरमध्ये एक फोटो शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये असेही लिहिले आहे की, ‘आमचा छोटा राजकुमार.’
वरूण आणि लावण्या या जोडप्याने त्यांच्या पहिल्या मुलाची ही आनंदाची बातमी देताच, सोशल मीडीयावर सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे. प्रत्येकजण आपापल्या शैलीत त्यांना शुभेच्छा देत आहेत. अल्लू अर्जुन आणि राम चरण सारख्या अनेक अभिनेत्यांनी त्यांचे अभिनंदन करत खास पोस्ट शेअर केली आहे..
खरंच अभिनेत्री स्वाती चिटणीस पूर्णाआजीच्या भूमिकेत? या कारणामुळे सुरु झाली चर्चा
अल्लू अर्जुन, राम चरण सारख्या अनेक स्टार्सनी अभिनेता वरुण आणि लावण्याचे अभिनंदन केले. कोण काय म्हणाले ते जाणून घेऊया
राम चरण याची एक्सवर खास पोस्ट
राम चरणने त्याच्या एक्स अकाउंटवर आनंद व्यक्त केला. तो म्हणाला, “तुमच्या लाडक्या छोट्या पाहुण्याबद्दल खूप खूप अभिनंदन. तुमचे बाळ तुम्हाला आणि आमच्या कुटुंबाला खूप आनंद आनंद देईल. देव तुम्हा तिघांनाही आशीर्वाद देवो.”
Dear Varun and Lavanya,
Huge congrats on your precious little one ❤️❤️I'm so happy seeing you both start this amazing chapter. May your baby bring you both and our family immense joy and happiness. God bless you 3 🥰❤️@IAmVarunTej @Itslavanya pic.twitter.com/BvIMANrLSu
— Ram Charan (@AlwaysRamCharan) September 10, 2025
राम चरण याची पत्नी उपासनाने दिल्या शुभेच्छा
अभिनेता राम चरण यांच्या पत्नी उपासना कामिनेनी कोनिडेला यांनीही वरुण तेज आणि लावण्या यांचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर Blockbuster सिनेमांचा मेळावा! पहा बेटर-हाफसह अनेक चित्रपट
चिरंजीवी यांनी केलं बाळाचे स्वागत
मेगास्टार चिरंजीवी यांनी इंस्टाग्रामवर एक गोंडस फोटो शेअर करून कोनिडेला कुटुंबातील नवीन पाहुण्यांचे स्वागत केले. त्यांनी कॅप्शनमध्ये असेही लिहिले की, ‘या लहान बाळाचे जगात स्वागत आहे! वरुण तेज आणि लावण्य त्रिपाठी यांना पालक झाल्याबद्दल अभिनंदन. नागाबाबू आणि पद्मजा आता अभिमानी आजी-आजोबा आहेत. लहान बाळासाठी खूप खूप आनंद आणि आशीर्वाद.’
अलू अर्जुन म्हणाला – या सुंदर प्रवासासाठी शुभेच्छा
दक्षिण अभिनेता अल्लू अर्जुनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी पोस्ट केली, ज्यामध्ये वरुण तेज त्याच्या पत्नीवर प्रेम करताना दिसत आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, ‘लहान पाहुण्याच्या आगमनाबद्दल तुम्हाला हार्दिक अभिनंदन. या सुंदर प्रवासाच्या सुरुवातीसाठी तुम्हा दोघांनाही शुभेच्छा.