(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे १६ ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी इंडस्ट्रीवर शोककळा पसरली. ज्योती चांदेकर यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ७८ व्या वर्षी त्या स्टार प्रवाहच्या ठरलं तर मग मालिकेत काम करत होत्या. त्यांनी साकारलेली पूर्णाआजी प्रेक्षकांच्या घर करून गेली. पण ज्योती चांदेकर यांच्या अचानक निधनाने मालिकेच्या टिमलाही मोठा धक्का बसला आहे. आणि आता मालिकेत पूर्णाआजीची भूमिका कोण साकारणार असे प्रश्न चाहत्यांना पडले.
ठरलं तर मग मालिकेत पूर्णा आजीची भूमिकेसाठी अनेक अभिनेत्रींची नाव चर्चेत आली होती. त्यात एक नाव सातत्यानं घेतलं जात होतं ते म्हणजे अभिनेत्री स्वाती चिटणीस यांचं. स्वाती चिटणीस या मालिकेत पूर्णाआजी साकारणार असं सांगितलं जात होत. खरंच मालिकेला नवीन पूर्णाआजी मिळाली का असा प्रश्न अनेक जण विचारत आहेत. पूर्णआजीच्या भुमिकेसाठी स्वाती चिटणीस यांचं नाव का चर्चेत आलं आहे? हे आपण आता जाणून घेणार आहोत.
BIGG BOSS 19 : आवेजने शेवटी आवाज उठवलाच, नगमाच्या नावावर संतापला! घरभर घातला राडा…पहा Promo
स्वाती चिटणीस या आता पूर्णा आज्जीच्या भूमिकेत दिसू शकतात अशा चर्चा सुरू झाल्या. दोघीचे कोलाज केलेले फोटो समोर आले. स्वाती चिटणीस यांचा लुक देखील हुबेहुब ज्योती चांदेकर यांच्यासारखा दिसला आहे. आता खरंच अभिनेत्री या भूमिकेत दिसणार आहे का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
या कारणामुळे रंगलीये चर्चा
इतकंच नाही तर स्वाती चिटणीस हिंदी मालिकेसह ‘तू ही रे माझा मितवा’ या स्टार प्रवाहवरील मालिकेतही काम करत होत्या. त्यांनी अर्णवच्या आजीची भूमिका साकारली होती. पण स्वाती यांनी अचानक ही मालिका सोडल्याची माहिती समोर आली आहे. तू ही रे माझा मितवा ही मालिका सोडल्यामुळे आता त्या ठरलं तर मग मालिकेत एन्ट्री घेणार असल्याची चर्चा सुरु झाली. ज्योती चांदेकर आणि स्वाती चिटणीस यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर प्रेक्षकांनीही स्वाती चिटणीस यांना पूर्णाआजी म्हणून पसंती दिल्याचं सोशल मीडियावर पाहायला मिळाले आहे.
हर्षवर्धन राणे डबिंगदरम्यान भावुक! एक दिवाने की दिवानियत दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला
काही दिवसांआधी अभिनेत्री जुई गडकरीनं नव्या पूर्णाआजीविषयी माहिती दिली होती. मालिकेत नव्या पूर्णाआजी कोण असतील हे आम्हालाही माहिती नाही. चॅनेलकडून अधिकृत माहिती आल्यावरच कळेल असं जुईने म्हटलं होतं. सोशल मीडियावरील व्हायरल माहितीवर विश्वास ठेवू नका असंही जुईनं सांगितलं होतं. आता अश्यातच अभिनेत्री स्वाती चिटणीस पूर्णाआजीच्या भूमिकेत खरंच दिसणार आहे का हे प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचे ठरले आहे.