(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अमृता राव. तिने आपल्या अभिनयातून अनेक शानदार चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सध्या ती ‘जॉली एलएलबी ३’ या चित्रपटात झळकत असून पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
या चित्रपटातील ‘पूणम’ या भूमिकेमुळे ती घराघरात ओळखली जाऊ लागली. अलीकडेच तिने रणवीर अल्लाहबादिया याच्या पॉडकास्टमध्ये या चित्रपटाबद्दल खास अनुभव शेअर केले आहेत. यावेळी ती म्हणाली, ”‘विवाह’नंतर मला अनेक एनआरआय यांची स्थळं यायची. लोक माझ्या घराखाली गाडी घेऊन उभे असायचे आणि माझ्याशी लग्न कर, असं म्हणायचे. एक-दोन नाही, तर मला अशी अनेक स्थळं आली होती. त्यावेळी मी हे बघून हसायचे आणि वाटायचं की, कशी माणसं आहेत ही”.
ए.आर. रहमानला दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा, ‘वीरा राजा वीरा’ गाण्यावरील कॉपीराइट लावले फेटाळून
अमृता हा अनुभव सांगताना पुढे म्हणाली, “काही लोकांनी तर पत्रंही लिहिली होती. एकदा तर मला रक्तानं लिहिलेलं पत्र आलेलं आणि तेव्हा मला खूप भीती वाटलेली. एक मुलगा होता, जो टेलिफोन बूथजवळ उभा असायचा माझ्या घराबाहेर आणि माझे आई किंवा बाबा फोन उचलायचे.” अमृतानं पुढे तिची तिच्या नवऱ्याबरोबर कशी भेट झाली याबद्दल सांगितलं आहे. तिनं सांगितलं की, तिची आणि तिचा नवरा आरजे अमोलची भेट झाली तेव्हा ती तिच्या आयुष्यातील कठीण प्रसंगातून जात होती. ती अनेक मोठ्या चित्रपटांतून झळकत होती; पण त्यादरम्यान तिला हव्या तशा भूमिकांसाठी विचारणा होत नव्हती.
Thamma: ‘स्त्री’ लाँच करणार ‘थामा’चा ट्रेलर; नवीन पोस्टरने वेधले लक्ष, होणार मोठी घोषणा
अमृता म्हणाली, ”मला जसे चित्रपट करायचे होते, तशा चित्रपटांसाठी मला विचारलं जात नव्हतं. मोठ्या ऑफर यायच्या; पण त्यात काहीतरी अटी असायच्या. जसं की एखाद्या किसिंग सीन आहे वगैरे तेव्हा मला वाटायचं की, मला फक्त अशा ऑफरच का येतात, ज्यामध्ये काहीतरी अडचणी असतातच? मी खचून जावं म्हणून लोक खूप काय काय बोलायचे. मला पार्ट्यांना, पुरस्कार सोहळ्यांना जायला आवडायचं नाही. मला फक्त माझं काम करायचं होतं आणि त्यानंतर घरी जायचं होतं. मी त्यावेळी खूप एकटी पडले होते.” हा अनुभव तिने प्रेक्षकांसोबत शेअर केला आहे. सध्या अभिनेत्री अमृता राव ‘जॉली एलएलबी ३’ या चित्रपटात झळकत असून पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.