फोटो सौजन्य - Jio Cinema सोशल मीडिया
बिग बॉस 18 नॉमिनेशन : बिग बॉस 18 आता वेगाने फिनालेकडे वाटचाल करत आहे. त्याच वेळी, सर्व स्पर्धक देखील विजेतेपदाच्या शर्यतीत पुढे जाण्यासाठी त्यांचा खरा खेळ खेळत आहेत. सारा अरफीन खानला काल म्हणजेच विकेंडच्या वॉरला घरातून बाहेर काढण्यात आले आहे. आता नव्या नॉमिनेट झालेल्या सदस्यांची यादीही समोर आली असून, यामध्ये आजच्या आगामी एपिसोडमध्ये मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता या वेळी कोणाला उमेदवारी देण्यात आली आहे आणि नॉमिनेशनचे कार्य काय होते याबद्दल सर्व काही जाणून घेऊया. जाणून घेऊया कोणते सदस्य नॉमिनेशमधून सुरक्षित झाले आहेत आणि कोणते स्पर्धक घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत.
आता बिग बॉस 18 ची नॉमिनेशन लिस्ट समोर आली आहे, जी पाहून तुम्हालाही धक्का बसणार आहे. यावेळी ईशा सिंग, चाहत पांडे, रजत दलाल, कशिश कपूर, अविनाश मिश्रा, विवियन डिसेना आणि श्रुतिका हे सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत.
🚨 Nominated Contestants for this week
☆ Eisha Singh
☆ Chahat Pandey
☆ Rajat Dalal
☆ Kashish Kapoor
☆ Avinash Mishra
☆ Vivian Dsena
☆ Shrutika ArjunComments – Who will EVICT?
— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) December 29, 2024
आजच्या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा नॉमिनेशन टास्क होणार आहे. असे प्रत्येक वेळी होत असले तरी यावेळी एक ट्विस्ट नॉमिनेशनमध्ये बिग बॉस देणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना आणि घरामध्ये असलेल्या स्पर्धकांच्या चाहत्यांना धक्का बसणार आहे. वास्तविक, सोशल मीडियावर कलर्सच्या सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये बिग बॉसच्या घरामध्ये दोन स्पर्धकांची छायाचित्रे असलेली सुरक्षा भिंत होती. शेवटचे दोन स्पर्धक ज्यांचे फोटो भिंतीवर राहील ते नॉमिनेशनमधून सुरक्षित होणार आहेत. घरातल्या उर्वरित सदस्यांना घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट केले जाणार आहे.
Bigg Boss 18 : गुगलवर या बिग बॉसच्या स्पर्धकाला मागील सात दिवसात केले सर्वाधिक सर्च!
यावेळी नॉमिनेशन टास्कमध्ये चुम दारंगने पहिले टाइम गॉड म्हणून विवियन डिसेना आणि रजत दलाल यांचे चित्र भिंतीवर लावले. तिला माहीत होते की, पुढे जो कोणी येईल त्याला दुसऱ्या स्पर्धकासोबत एक फोटो स्वॅप करावा लागणार आहे. चाहतने आधी विवियनला नॉमिनेट केले आणि करणवीरला सेफ केले, मग अविनाशने रजतला नॉमिनेट केले आणि चाहतचा फोटो टाकला. विवियनने चाहतला नॉमिनेट केले आणि श्रुतिकाचा फोटो भिंतीवर लावला. रजतने करणवीर आणि शिल्पाला नॉमिनेट केले.
खेळात ट्विस्ट नसेल तर मजा नाही. ईशा सिंहने शिल्पा शिरोडकरला नॉमिनेट केले आणि अविनाशला वाचवले, यानंतर कशिशने शिल्पाला नॉमिनेट केले आणि रजतला वाचवले. श्रुतिकाने रजतला नॉमिनेट केले आणि करणवीर सुरक्षित केले. करणवीरने आपल्या मुलाचे कर्तव्य बजावत शिल्पाला वाचवले आणि ईशाला नॉमिनेट केले आहे.
Nomination Task: Chum placed Rajat Dalal and Vivian Dsena’s pictures on the wall
☆ Chahat removed Vivian pic and replaced it with Karan Pic.
☆ Avinash removed Rajat Pic & replaced it with Chahat Pic.
☆ Vivian removed Chahat Pic & replaced it with Shrutika Pic.
☆ Rajat…— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) December 29, 2024