फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बिग बॉस 18 – रजत दलाल विरुद्ध करणवीर मेहरा : बिग बॉस 18 च्या कालच्या भागामध्ये नॉमिनेशनची टास्क झाला, यामध्ये घराबाहेर जाण्यासाठी सात सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता फक्त बिग बॉसच्या फिनालेला २ आठवडे शिल्लक राहिले आहेत. या आठवड्यांमध्ये बिग बॉसच्या घराबाहेर जाण्यासाठी विवियन, अविनाश मिश्रा, इशा सिंह, रजत दलाल, चाहत पांडे, कशीश कपूर आणि श्रुतिका अर्जुन हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. या आठवड्यामध्ये डबल एव्हिक्शन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आता पुढील भागाचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यामध्ये कंगना रनौत घरामध्ये एन्ट्री करणार आहे. यावेळी बिग बॉसच्या घरातल्या सदस्यांना टॉर्चर टास्क दिला जाणार आहे. या टास्कमध्ये रजत दलाल आणि करणविर मेहरा यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण पाहायला मिळणार आहे. व्हायरल होत असलेल्या प्रोमोमध्ये सुरुवातीला इमर्जन्सी टास्क देण्यात येणार आहे आणि यामध्ये करणविर मेहरा आणि अविनाश मिश्रा हे दोघे डॉक्टरांची भूमिका निभावतात. यामध्ये ते रुग्ण म्हणून रजत दलाला बोलावतात आणि यावेळी रजत दलालची दाढी ट्रिम करण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी रजत दलाला राग येतो आणि म्हणतो तुमच्यात हिंमत असेल तर करून दाखवा. यावेळी ट्रिमर घेऊन करणवीर खरोखर त्याची दाढी ट्रिम करतो त्यानंतर त्याच्यावर चिखलाचे पाणी टाकतो.
Bigg Boss 18 : नॉमिनेशनमध्ये मोठा ट्विस्ट! जाणून घ्या कोणी कोणाला वाचवले आणि कोण होणार सुरक्षित?
यावर रजत आणखीनच संतापतो आणि म्हणतो आता माझी वेळ येईल तेव्हा कोणीच काही बोलायचं नाही. त्यानंतर रजत दलाल आणि चाहत पांडे हे दोघेही डॉक्टरची भूमिका निभावतात आणि यावेळी ते रुग्ण म्हणून बोलावतात. यावेळी प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे चिखलाचे पाणी जोरात तोंडावर करणच्या फेकले जाते. त्यानंतर खुर्चीवरून उठतो आणि तरीही रजत दलाल त्याला खेचण्याचा प्रयत्न करत असतो त्यानंतर करणवीर आणखीनच संतप्त होतो. यावर तो म्हणतो तुझ्यासारखे दोन पुढे दोन मागे आणि दोन व्हॅनिटीमध्ये ठेवतो मी. त्यांचे दोघांचे हे भांडण कोणत्या टोकाला पोहोचते हे पाहणे मनोरंजक ठरेल.
Emergency Ward Task – Rajat Dalal vs Karanveer Mehrapic.twitter.com/mZUyXtj58h
— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) December 30, 2024
प्रोमोमध्ये कंगना रनौत घरामध्ये एन्ट्री करणार आहेत यावेळी ती घरच्यांवर संतापलेली दिसत आहे कारण की घरच्यांनी तिने दिलेला तो टास्क पूर्ण केलेल्या नसल्यामुळे ती घरच्यांना शिक्षा देणार आहे. आणखी कंगनाच्या आल्यानंतर कोणत्या नवीन तास घरामध्ये होतील आणि कशाप्रकारे घरातले सदस्य ते आव्हानं स्वीकारतील हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे..