फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बिग बॉस 18 नॉमिनेशन वोटिंग ट्रेंड : बिग बॉस 18 चा हा दहावा आठवडा सुरु आहे. यामध्ये सहा सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. या आठवड्यामध्ये करणवीर मेहरा, दिग्विजय राठी, विवियन डिसेना, एडिन रोझ, चाहत पांडे आणि तिजेंदर बग्गा हे सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. बिग बॉस 18 चा एक नवीन प्रोमो समोर आला आहे ज्यामध्ये बिग बॉस नामांकित स्पर्धकांना पळून जाण्याची संधी देते. पण यादरम्यान असे काही घडते की रजत दलाल आणि करणवीर मेहरा यांच्यात भांडण होते. इतकंच नाही तर करणला दुखापत झाली आणि तो आणखीनच चिडला आणि म्हणतो आता मी त्याला सोडणार नाही. परंतु अजूनही बिग बॉसने नॉमिनेट झालेल्या सदस्यांसाठी वोटिंग लाईन चालू ठेवल्या आहेत. यामध्ये आता वोटिंग लाईनची आकडेवारी समोर आली आहे.
बिग बॉस 18 संबंधित बातमीसाठी येथे क्लिक करा.
सोशल मीडियावर बिग बॉस खबरीचे पेजने शेअर केलेल्या, बिग बॉस १८ च्या दहाव्या आठवड्यामध्ये नॉमिनेट झालेल्या सदस्यांच्या यादीमध्ये अव्वल स्थानावर करणवीर मेहरा आहे. सध्या तो मोठ्या संख्येने आघाडीवर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर अभिनेता विवियन डिसेना आहे. त्यानंतर तिसऱ्या स्थानावर दिग्विजय राठी आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर कमी वोट्सची आघाडी आहे त्यामुळे ते दोघे कधीही दुसरे किंवा तिसरे स्थान गाठू शकतात. त्यानंतर चौथ्या स्थानावर चाहत पांडे आहे. पाचव्या आणि सहाव्या स्थानावर अनुक्रमे तिजेंदर बग्गा आणि एडिन रोज आहे. त्यामुळे तिजेंदर बग्गा आणि एडिन रोज यांचे घराबाहेर जाण्याचे चान्स जास्त आहेत.
Exclusive
Current Voting trends…
1) #KaranveerMehra
2) #VivianDsena
3) #DigvijayRathee
4) #ChahatPandey
5) #TajinderBagga
6) #EdinRoseKaran is leading now, small differences between Vivian & Digvijay, Bagga and Edin are in danger. #BiggBoss18 #BB18 #BiggBoss
— Biggboss Khabri (@BiggbossKaTadka) December 12, 2024
सोशल मीडियावर कलर्सने टास्कचा एक प्रोमो प्रदर्शित केला आहे. यामध्ये सर्व घरातील सदस्य लिव्हिंग एरियामध्ये बसलेले असतात जेव्हा बिग बॉस म्हणतात की आज मी नामांकित स्पर्धकांना धोक्यापासून वाचण्यासाठी संधी देणार आहे. यानंतर, सर्व घरातील सदस्य हे टास्क करतात आणि करणला दुखापत झाल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. त्याच्या डोळ्याखाली जखम झाली असून रक्तस्त्रावही होत आहे. यानंतर रजत ओरडतो की त्याने का धरले आहे असे करणला विचारतो. करण म्हणतो की मला लागले आहे आणि तू माझ्यावर काय ओरडतो. रजत म्हणतो की, मध्ये कोणी आले तर माझी जबाबदारी नसणार आहे.
Gharwalon ko mila mauka to stay safe from eviction, kya task mein saamne aayenge sab ke asli intentions? 😱
Dekhiye #BiggBoss18 @ColorsTV aur #JioCinema par.#BB18 #BiggBoss18onJioCinema #BiggBoss @BeingSalmanKhan pic.twitter.com/hrdwkB5uCm
— JioCinema (@JioCinema) December 12, 2024
मात्र, करणला राग येतो आणि दुखापतीचा राग काढण्यासाठी तो म्हणतो की आता मी कोणालाही सोडणार नाही, कोणीही खोली सोडणार नाही. मी सर्वांना सरळ करीन. याआधीही टाईम गॉड टास्कदरम्यान दोघांमध्ये भांडण झाले होते, जेव्हा टास्कदरम्यान रजतने चुम दारंगला धक्का दिला होता. करण म्हणाला होता की, जर तुम्हाला तुमची ताकद दाखवायची असेल तर मुलांना दाखवा, हा खेळ ताकद दाखवण्याचा नसून हा एक व्यक्तिमत्त्वाचा खेळ आहे.