(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाचा पहिलाच आठवडा सदस्यांनी चांगलाच गाजवत आहेत. वाद, मैत्री, भावून क्षण, टास्क जिंकण्यासाठीची चढाओढ आणि नॉमिनेशन टास्क यांनी रंगला आहे. रितेश देशमुख यांच्या ‘भाऊचा धक्का’ येण्यापूर्वीच घरात कमालीचा तणाव निर्माण झाला असून, पहिल्याच आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी ९ सदस्य नॉमिनेट झाले आहेत. प्रभू शेळके, दीपाली सय्यद, कारण सोनावणे, दिव्या शिंदे, सागर कारंडे, रोशन भजनकर, अनुश्री माने, राधा पाटील, रुचिता जामदार यांच्यामध्ये कॅप्टन्सी टास्क पाहायला मिळणार आहे.
आत या कॅप्टन्सी टास्कमध्ये कोण बाजी मारणार आणि या घराचा पहिला कॅप्टन कोण होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. तसेच बिग बॉस मराठीच्या घरात आज ‘बीबी फार्म’ टास्कने खेळाचे समीकरण पूर्णपणे बदलून जाणार आहे. ‘बिग बॉस मराठी’ सिझन ६ प्रेक्षकांना आवडत आहे. तसेच आता पुढे नक्की काय घडणार हे येणाऱ्या भागात पाहायला मिळणार आहे.
कुरळे ब्रदर्सचा जल्लोष! तब्बल १९ वर्षांनंतर ‘साडे माडे तीन’चे धमाकेदार रियुनिअन सेलिब्रेशन
‘बीबी फार्म’ (BB Farm) टास्क: घराचे झाले रणांगण!
पहिल्या आठवड्यात कॅप्टन्सीसाठी ‘बीबी फार्म’ हा टास्क पार पडणार आहे ज्यात समर्थकांमध्ये झुंज पाहायला मिळणार आहे. या टास्कमध्ये स्पर्धकांची दोन गटांत विभागणी करण्यात येणार आहे. शेतातील कापूस आणि इतर मालमत्ता जमा करण्याच्या या खेळात स्पर्धकांनी सर्व मर्यादा ओलांडल्याचे पाहायला मिळाले. धक्काबुक्की आणि वाद: प्रोमोमध्ये दिसल्याप्रमाणे, विशाल आणि ओमकार यांच्यात शारीरिक झटापट झालेचे दिसले आहे. रोशनने रागाच्या भरात आक्रमक पवित्रा घेतल्याने घरातील इतर सदस्यांनी मध्यस्थी केली.
Zubeen Garg : ‘हत्या नव्हती, दारूच्या नशेत होता आणि…’, झुबिन गर्गच्या मृत्यूसंदर्भात मोठा खुलासा
नॉमिनेशन प्रक्रिया: ९ स्पर्धक रडारवर
नॉमिनेशन प्रक्रियेत घरातील ९ सदस्यांवर इविक्शनची टांगती तलवार आली आहे. या प्रक्रियेत स्पर्धकांनी एकमेकांवर गंभीर आरोप करत एकमेकांना नॉमिनेट केले. नॉमिनेटेड सदस्य यांमध्ये कोण टिकणार आणि कोण बाहेर पडणार हे लवकरच समजणार आहे. तसेच आता या ‘बिग बॉस मराठी ६’ सीझन काय धमाका करणार हे पाहणे उत्सुकतेचे आहे.






