Top Marathi News Today Live: चांदीचे दर 3 लाख रुपयांचा टप्पा पार करणार? वाढत्या दराने ग्राहक चिंतेत
15 Jan 2026 09:45 AM (IST)
महिला प्रीमियर लीग २०२६ चा ७ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात खेळला गेला. नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या यूपी वॉरियर्सना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. यूपीकडून कर्णधार मेग लॅनिंगने शानदार अर्धशतक झळकावले, तर हरलीन देओलनेही ४७ धावांचे योगदान दिले. लक्ष्याचा पाठलाग करताना, दिल्लीने सामना सहज जिंकला. दिल्लीने हंगामातील त्यांचा पहिला विजय मिळवला, तर यूपीला सलग तिसरा पराभव पत्करावा लागला.
15 Jan 2026 09:35 AM (IST)
तेहरान : गेल्या काही दिवसांपासूने सुरु असलेल्या इराण (Iran) आणि अमेरिकेतील तणाव आता शिगेला पोहोचला आहे. अमेरिकेने इराणवर हल्ल्याची धमकी दिल्यानंतर मध्यपूर्वेत कतारमध्ये अमेरिकन सैन्याच्या लष्करी हालचाली दिसून आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर इराणने देखील डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ उडाली आहे.
15 Jan 2026 09:25 AM (IST)
टोनर बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये गुलाब पाणी आणि कोरफड जेल घेऊन व्यवस्थित मिक्स करा. मिक्स करून झाल्यानंतर त्यात विटामिन कँप्सूल, केशर काड्या घालून पुन्हा एकदा मिक्स करा. तयार केलेले मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. त्यानंतर रात्री झोपण्याआधी आणि सकाळी उठल्यानंतर मेकअप करण्याआधी तयार केलेले टोनर त्वचेवर लावावे. यामुळे काही दिवसात चेहऱ्यावर चमकदार ग्लो येईल.
15 Jan 2026 09:15 AM (IST)
मुंबईतील प्रभाग क्रमांक १९२ मध्ये मनसे उमेदवार यशवंत किललेदार यांनी मतादानाचा अधिकार बजावला. पण त्याचवेळी त्यांना मतदान केंद्रावर दुबार मतदारही आढळून आला. दुबार यादीत असलेल्या महिला मतदाराला थांबवण्यात आले. त्यांच्या आधारकार्डवरून त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र भरून घेऊन त्यांना मतदान करू दिलेा जाऊई. पण त्याचवेली ही सर्व निवडणूक आयोगाची चूक असल्याची टिका किल्लेदार यांनी केली. या प्रभा क्रमांक 192 मध्ये मनसेचे यशवंत किल्लेदार विरुद्ध शिवसेना शिंदे गटाच्या प्रीती पाटणकर यांच्यात लढत होत आहे.
15 Jan 2026 09:15 AM (IST)
मकर संक्रांतीच्या आनंदाला गालबोट लावणारी एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नायलॉन मांजाने एका व्यक्तीचा जीव घेला आहे. त्या व्यक्तीने रक्ताच्या थारोळ्यात आपल्या मुली सोबत शेवटचे बोलण्यासाठी फोन लावण्याचा प्रयत्न केला मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते. ही घटना कर्नाटकच्या बीदर जिल्ह्यात घटना घडली.
15 Jan 2026 09:01 AM (IST)
गेल्या अनेक महिन्यांपासून बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असलेल्या पुणे, नागपूर, मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांसाठी गुरुवारी मतदान पार पडत आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांसाठी या निवडणुका अतिशय महत्वाच्या आहेत. मतदान पार पडल्यानंतर उद्या शुक्रवारी (दि.16) ला निकाल जाहीर केले जाणार आहेत. प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे. असे असले तरी निवडणूक आयोगाच्या एका निर्णयाची चर्चा सुरु आहे.
15 Jan 2026 08:48 AM (IST)
भारताचा अंडर 19 संघ आजपासून 2026 च्या विश्वचषकाचा शुभारंभ करणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना हा यूएसएविरुद्ध खेळवला जाणार आहे. हा सामना भारताचा बुलावायो येथे 15 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. भारतीय संघाची दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका झाली यामध्ये भारताचे संघाने एकतर्फी मालिका जिंकून चांगली तयारी तयारी गेली आहे. भारतीय संघाचे कर्णधार पद हे आयुष म्हात्रेकडे असणार आहे तर संघाचा उपकर्णधार हा विहान मल्होत्रा असणार आहे.
15 Jan 2026 08:38 AM (IST)
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियमवर खेळला गेला. टॉस गमाणाऱ्या भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत केएल राहुलच्या शानदार नाबाद शतकाच्या जोरावर न्यूझीलंडसमोर २८५ धावांचे लक्ष्य दिले होते. डॅरिल मिशेलच्या नाबाद शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने २८५ धावांचे लक्ष्य गाठून भारताचा ७ विकेट्सने पराभव केला. या विजयासह न्यूझीलंडने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.
15 Jan 2026 08:35 AM (IST)
जळगावात ईव्हीएम मशीनचा मांडणीचा क्रम नियमांनुसार नसल्याने गोंधळ निर्माण झाला होता. यामुळे निवडणूक कर्मचारी आणि उमेदवार प्रतिनिधींमध्ये शाब्दिक वाद देखील झाला.
15 Jan 2026 08:28 AM (IST)
निसान मोटर कंपनीने आफ्रिका, मध्य पूर्व, भारत, युरोप आणि ओशिनिया (AMIEO) या महत्त्वाच्या प्रदेशात वरिष्ठ व्यवस्थापन पातळीवरील बदलांची घोषणा केली आहे. हे बदल कंपनीच्या Re:Nissan परिवर्तन योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी, तसेच कार्यक्षमता, स्पीड आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने करण्यात आले आहेत.
या बदलांचा भाग म्हणून, १ जानेवारी २०२६ पासून थियरी साबाघ यांच्या जबाबदाऱ्यांचा विस्तार करण्यात आला असून, त्यांच्याकडे आता निसान इंडियाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. ते आता डिव्हिजनल व्हाइस प्रेसिडेंट आणि अध्यक्ष – मध्य पूर्व, KSA, CIS आणि भारत (निसान आणि इन्फिनिटी) या पदावर कार्यरत असतील.
15 Jan 2026 08:18 AM (IST)
सामान्य ग्राहकाला अशा कार्सची गरज असते, ज्या किफायतशीर, चांगले मायलेज देणाऱ्या आणि कमी मेंटेनन्स खर्चाच्या असतात. विशेषतः जर तुम्ही रोजच्या अप-डाउनसाठी स्वस्त कार शोधत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. GST कपातीनंतर सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या काही सर्वात स्वस्त कार्स कोणत्या आहेत, त्याबद्दल जाणून घेऊयात
15 Jan 2026 08:08 AM (IST)
भारतात 15 जानेवारी रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 14,401 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 13,201 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,801 रुपये आहे. भारतात 15 जानेवारी रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,32,010 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,44,010 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,08,010 रुपये आहे. भारतात 15 जानेवारी रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 290.10 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,90,100 रुपये आहे.
Maharashtra to World Breaking News: सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत असण्याचे पाहायला मिळत आहे. पण केवळ सोनंच नाही तर चांदीचे दर देखील दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत चांदीने मोठी झेप घेतली आहे. चांदीचे दर 24 तासांत 15 हजार रुपयांनी वाढले आहेत. दर सतत वाढत असल्याने खरेदी कशी करावी असा प्रश्न ग्राहकांसमोर निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या निवडणुकीच्या रणधुमाळीचा परिणाम सोन्याच्या आणि चांदीच्या किंमतीवर देखील होत आहे. चांदीच्या किंमतीत आज मोठी वाढ झाली आहे.






