जॅकलिन फर्नांडिसची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली (Photo Credit- X)
Jacqueline Fernandez: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez) सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. महाठग सुकेश चंद्रशेखरशी संबंधित २०० कोटींच्या फसवणूक प्रकरणात दाखल केलेली तिची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. या निर्णयामुळे जॅकलिनला कोणताही दिलासा मिळालेला नाही. यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयानेही तिची याचिका फेटाळली होती, ज्याला तिने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
Supreme Court declines Jacqueline Fernandez’s request to dismiss money laundering case.
Fernandez is an accused in the money laundering case linked to the conman Sukesh Chandrasekhar.#supremecourt #moneylaundering pic.twitter.com/XmPSSNxVK0
— The Tatva (@thetatvaindia) September 22, 2025
मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने (ED) दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी जॅकलिन फर्नांडिसची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने ३ जुलै रोजी फेटाळली होती. उच्च न्यायालयाने म्हटले होते की, आरोपीने खरोखरच गुन्हा केला आहे की नाही, याचा निर्णय केवळ सुनावणीदरम्यान कनिष्ठ न्यायालयच घेऊ शकते. मात्र, जॅकलिन फर्नांडिसने दिल्ली उच्च न्यायालयात दावा केला होता की, तिच्यावरील सर्व आरोप खोटे आहेत आणि तिला सुकेश चंद्रशेखरच्या गुन्हेगारी इतिहासाची कोणतीही माहिती नव्हती.
२०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अभिनेत्री जॅकलिनला आरोपी बनवले आहे. ईडीने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, सुकेश चंद्रशेखरच्या गुन्हेगारी कारवायांची माहिती असूनही जॅकलिन त्याच्याकडून महागड्या भेटवस्तू आणि दागिने घेत होती. या आरोपांच्या विरोधात जॅकलिनने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तिने केवळ ईडीचा गुन्हा रद्द करण्याचीच नव्हे, तर कनिष्ठ न्यायालयाने आरोपपत्राची दखल घेण्याच्या आदेशालाही आव्हान दिले होते.
गुलाबी ड्रेस अन् चेहऱ्यावर तेज… jacqueliene म्हणजे सुंदरतेची नवी व्याख्या!
सुकेश चंद्रशेखर हा कर्नाटकातील बंगळूरू येथील रहिवासी असून, तो फसवणुकीचा मास्टर मानला जातो. त्याने अभिनेत्री लीना मारिया पॉल हिच्याशी विवाह केला, जी त्याच्या गुन्हेगारी कामांमध्ये त्याची साथीदार होती. सुकेशला १७ व्या वर्षी पहिल्यांदा एका फसवणुकीच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्याने एका कौटुंबिक मित्राची दीड कोटी रुपयांची फसवणूक केली होती. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींसोबतही त्याचे संबंध होते.