(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर याचा ४३वा वाढदिवस रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कुटुंबातील सदस्यांपासून ते चाहत्यांपर्यंत सर्वांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. अनेकांनी त्याला भेटवस्तू पाठवल्या आणि सोशल मीडियावर विविध पद्धतीने शुभेच्छा दिल्या.
मात्र, या उत्सवात एक अनपेक्षित क्षण घडला. पापाराझी रणबीरचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले असताना, रणबीर कपूरने त्यांच्यावर नाराजी व्यक्त करत त्यांना घराबाहेर जाण्यास सांगितले, यावेळी रणबीर पापाराझींवर भडकला आणि त्याने सगळ्या पापाराझींना गेटच्या बाहेर काढलं. सध्या रणबीरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रणबीरच्या वाढदिवशी त्याला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पापाराझी त्याच्या घराच्या गेटजवळ आले, ज्यामुळे रणबीरचा पारा चढला. रणबीरने नाराजी व्यक्त करत म्हटले, ” बिल्डिंगवाले तक्रार करतील. तुम्ही बिल्डिंगमध्ये येऊ शकत नाही”. तरीही पापाराझींनी त्याचे फोटो घेण्याची मागणी सुरूच ठेवली. पुढे रणबीर म्हणाला, “वाट लागेल… अरे माझे १२ वाजतील, इथे हे सगळं अलाउड नाहीये.” पण , अखेर पापाराझींचा हट्ट पाहून रणबीरने त्यांच्यासोबत केक कापला.
‘लास्ट स्टॉप खांदा…’ चित्रपटाचे कलरफुल पोस्टर लाँच, श्रमेश बेटकरसोबत दिसणार ‘ही’ अभिनेत्री
करूरमधील घटनेमुळे लोकं संतापली, विजयचे रक्ताने माखलेले पोस्टर चर्चेत; ‘मारेकऱ्याला करा अटक…’
अभिनेता रणबीर कपूर आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या लाईफस्टाइल ब्रँड ‘Arx’ च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर लाईव्ह आला होता.या लाईव्हमध्ये त्याने आपल्या वाढदिवसाचा खास अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला. तो म्हणाला,“खूप छान दिवस होता. मी पूर्ण दिवस आलिया आणि राहासोबत घालवला… आणि फारसं काही केलं नाही. राहाने मला वचन दिलं होतं की ती मला ४३ किसेस देईल, आणि ती मिळाली! त्यानंतर तिने मला एक सुंदर कार्ड बनवलं, ज्यामुळे मी खूप भावूक झालो. त्यामुळे हा वाढदिवस माझ्यासाठी परफेक्ट ठरला.”