(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
“धुरंधर” मधील आर. माधवनचा लूक रिलीज
रणवीर सिंगने स्वतः त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर “धुरंधर” मधील आर. माधवनचा पहिला लूक शेअर केला. पोस्टर शेअर करताना अभिनेत्याने लिहिले, “कर्मा का सारथी… तीन दिवस बाकी आहेत! धुरंधर ट्रेलर १२ नोव्हेंबर रोजी दुपारी १२:१२ वाजता रिलीज होणार आहे. हा चित्रपट ५ डिसेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल होईल…”. असे लिहून ही पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्याच्या या पोस्टमुळे चाहते चित्रपटासाठी आणखी उत्साहित झाले आहेत. शिवाय, कमेंट सेक्शनमध्ये सर्वजण माधवनच्या लूकचे कौतुक करत आहेत.
जबरदस्त लूकमध्ये दिसला अभिनेता
चित्रपटाच्या पोस्टरमध्ये आर. माधवन गंभीर लूकमध्ये दिसत आहे. सूट आणि बूट घालून तो खुर्चीवर बसला आहे. चष्मा घालून, अभिनेता कॅमेऱ्याकडे लक्षपूर्वक पाहत आहे. त्याच्या लूकमुळे प्रेक्षकांची उत्सुकता आधीच वाढली आहे. चित्रपटाचा ट्रेलर १२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. निर्माते संपूर्ण स्टारकास्टच्या उपस्थितीत एका भव्य कार्यक्रमात ट्रेलर लाँच करतील अशी अपेक्षा आहे. तसेच हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.
Jolly LLB 3 OTT: अर्शद-अक्षयचा आता ओटीटीवर कल्ला; १०० कोटींचा चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
‘धुरंधर’ ची स्टार कास्ट
रणवीर सिंग व्यतिरिक्त, चित्रपटात आर. माधवन, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन, संजय दत्त आणि राकेश बेदी यांच्याही भूमिका पाहायला मिळणार आहेत. या ॲक्शन थ्रिलरमध्ये रणवीर सिंग एका दमदार ॲक्शन सीक्वेन्समध्ये दिसणार आहे. टीझरमध्ये त्याची दमदार शैली देखील स्पष्टपणे दिसून आली. हा चित्रपट ५ डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. आता हा चित्रपट रिलीज होण्यासाठी काहीच दिवस बाकी राहिले आहेत.






