Irrfan Khan (फोटो सौजन्य- X अकाउंट)
राधिका मदन ही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे यात शंकाच नाही. ‘मेरी आशिकी तुम से ही’ या डेली सोपमधून प्रसिद्धी मिळवल्यानंतर राधिकाने फिल्मी दुनियेत आपला ठसा उमटवला आहे. तिने या मालिकेनंतर ‘पटाखा’, ‘मर्द को दर्द नहीं होता’ आणि ‘शिद्दत’ सारख्या चित्रपटात काम केले आहे. आणि प्रेक्षकांची पसंती निर्माण केली. या चित्रपटानंतर तिला अनेक बॉलीवूड स्टार्ससोबत काम करण्याची संधी प्राप्त झाली.
2020 मध्ये रिलीज झालेल्या ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटाने राधिका मदनला लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात ती इरफान खानच्या मुलीच्या भूमिकेत दिसली होती. दिग्गज अभिनेत्यासोबत स्क्रीन शेअर करणे ही राधिकासाठी मोठी गोष्ट होती, पण तरीही तिला एका गोष्टीचा पश्चाताप होतो. एका मुलाखतीदरम्यान तिने या महान कलाकाराची आठवण काढून या चित्रपटाचा एक किस्सा शेअर करताना दिसली आहे. ज्यावेळी ती भावुक आणि दुःखी झाली.
राधिकाला आली ऑन-स्क्रीन इरफान खान यांची आठवण
राधिका मदानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, तिला ‘अंग्रेजी मीडियम’च्या सेटवर इरफान खानशी न बोलल्याबद्दल खेद वाटतो. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना राधिका म्हणाली, “मी नुकताच हा चित्रपट माझ्या मित्राला दाखवत होते कारण त्याने तो पाहिला नव्हता आणि मी असाच चित्रपट पुन्हा कधी करू शकेन का याचा विचार करत राहिले. मला इरफान सरांची खूप आठवण येत होती.” असे तिने या मुलाखतीत सांगितले.
हे देखील वाचा- कोविड-19 नंतर अक्षय कुमारने चित्रपट निवडण्याच्या पद्धतीत केले बदल, अभिनेत्याने घेतला मोठा निर्णय!
राधिका मदनला होतोय पश्चाताप
‘अंग्रेजी मीडियम’ चित्रपटाच्या सेटवर अभिनेत्री राधिका मदन पूर्णपणे तिच्या व्यक्तिरेखेवर केंद्रित होती. शूटिंगनंतर कधीतरी इरफानशी बोलेल असं तिला वाटत होते. पण तसेच काहीच घडले नाही. राधिका म्हणाली, “मी विचार करत होते की मी त्यांच्यासोबत जास्त का बोली नाही आणि त्यांच्या मनातून गोष्टी का काढल्या नाहीत. मी सेटवर खूप शांत असायची आणि मी त्यांना त्यांचा एकटा वेळ देयीची. माझे पूर्ण लक्ष माझ्या व्यक्तिरेखावर केंद्रित होते. मला वाटले की या चित्रपटानंतर त्यांच्याकडे चित्रपट, अभिनय आणि क्राफ्ट यावर चर्चा करण्यासाठी भरपूर वेळ असेल, परंतु ते खूप काही सहन करत होते.’ असे तिने या मुलाखतीत सांगितले.
‘अंग्रेजी मीडियम’ रिलीज झाल्यानंतर दीड महिन्यातच इरफान खानचा कर्करोगाने मृत्यू झाल्याची माहिती आहे. आणि या नंतर त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आणि त्यांनी ‘अंग्रेजी मीडियम’ हा शेवटचा चित्रपट करून सगळ्यांचा कायम स्वरूपी निरोप घेतला. अजूनही चाहत्यांच त्यांच्यावर भरपूर प्रेम आहे. इरफान खानच्या चित्रपटावर, अभिनयावर आणि त्यांच्या कलाकौशल्यावर चाहते अजूनही यासाठी वेडे आहेत.