नवीन वर्ष 2025 ची सुरुवात मोठ्या दिमाखात झाली आहे आणि त्यासोबतच मनोरंजन विश्वात नवीन चित्रपट आणि वेब सिरीजचीही धूम आहे. या वर्षीही ॲक्शन-थ्रिलर आणि कॉमेडीने भरलेले रोमांचक चित्रपट आणि वेब सिरीज येणार आहेत. यंदाही प्रेक्षकांना काहीतरी धमाकेदार पाहायला मिळणार आहे. यावर्षी नवनवीन चित्रपट आणि वेब सिरीज पाहायला मिळणार आहे. या वर्षी सिनेमागृहात धमाल करणाऱ्या चित्रपट आणि वेब सिरीजवर एक नजर टाकूयात.
'सिकंदर'पासून 'फॅमिली मॅन 3' पर्यंत हे मोठे चित्रपट आणि वेब सिरीज यावर्षी होणार प्रदर्शित (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Sikandar Movie Poster
वॉर 2- हृतिक रोशन त्याच्या 2019 च्या ब्लॉकबस्टर वॉरच्या सिक्वेलसह पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आणि ज्युनियर एनटीआर नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. स्वातंत्र्य दिन 2025 वीकेंडला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे.
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
दोन घटस्फोटानंतर आमिर खान पुन्हा तिसऱ्यांदा पडला प्रेमात ? कुटुंबासोबतही दिली करुन ओळख; कोण आहे ती?
2025 चे इतर चित्रपट - या वर्षी अक्षय कुमार आणि अर्शद वारसीचा 'जॉली एलएलबी 3' देखील रिलीज होणार आहे. वरुण धवन आणि जान्हवी कपूरचा 'सनी संस्कार की तुलसी कुमारी', विकी कौशल आणि रश्मिका मंदान्नाचा 'छावा', आलिया भट्ट आणि शर्वरी वाघचा 'अल्फा' अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे.
स्टारडम - 2025 मध्ये बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान दिग्दर्शनाच्या दुनियेत पदार्पण करणार आहे. आर्यन खान 'स्टारडम' मालिकेद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.
पाताल लोक २ - चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, जयदीप अहलावत पाताळ लोक सीझन 2 मध्ये हाती राम चौधरीच्या भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी परत आला आहे. निर्मात्यांनी अलीकडेच जयदीप अहलावतच्या एका मनोरंजक पोस्टरसह नवीन हंगामाची घोषणा केली ही मालिका 2025 मध्ये प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.
द रोशन्स - रोशन कुटुंबावर आधारित एक डॉक्युमेण्ट सिरीजही यंदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बहुप्रतिक्षित माहितीपट मालिका 'द रोशन्स' 10 जानेवारी 2025 रोजी नेटफ्लिक्सवर प्रीमियर होणार आहे.