(फोटो सौजन्य-Social Media)
निर्माता साजिद नाडियाडवालच्या यशस्वी चित्रपट फ्रेंचायझींमध्ये हाऊसफुलचे नाव अव्वल आहे. अक्षय कुमार स्टारर या चित्रपटाचे चार भाग आतापर्यंत प्रदर्शित झाले आहेत आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे चारही भाग सुपरहिट ठरले आहेत. ही फ्रेंचायझी सुरू ठेवण्याची घोषणा निर्मात्यांनी गेल्या वर्षी हाऊसफुल 5 म्हणून केली होती. अक्षय कुमार व्यतिरिक्त या चित्रपटात अनेक स्टार्स दिसणार आहेत, ज्यांच्या नावाची याआधी खूप चर्चा झाली होती. आता बातम्या येत आहेत की 80 च्या दशकातील सुपरस्टार देखील हाऊसफुल 5 कास्टचा भाग होणार आहे.
हा 67 वर्षांचा अभिनेता हाऊसफुल 5 मध्ये होणार सहभागी
हाऊसफुल 5 ने आपल्या स्टार कास्टच्या संदर्भात बऱ्याच दिवसांपासून हेडलाईन केल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच ही बातमी समोर आली होती की अक्षय कुमारच्या या सिनेमात फरदीन खान आणि संजय दत्त सारखे कलाकारही कॉमेडीचा टच टाकताना दिसणार आहेत. पण आता हाऊसफुल 5 च्या कलाकारांमध्ये आणखी एक मोठे नाव जोडले गेले आहे, ते म्हणजे 67 वर्षीय अभिनेता जॅकी श्रॉफ. हा बॉलीवूड स्टार देखील या चित्रपटामध्ये झळकणार आहे.
बॉलीवूड हंगामाच्या रिपोर्ट्सवर आधारित, जॅकी श्रॉफ हाऊसफुल 5 मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. 1983 मध्ये ‘हिरो’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणारा जॅकी त्याच्या कॉमिक टायमिंगसाठी खूप प्रसिद्ध आहे. अशा परिस्थितीत हाऊसफुल 5 मध्येही तो चाहत्यांना हसवण्यात कोणतीही कसर सोडणार नाही हे निश्चित. आतापर्यंत अक्षय कुमार, फरदीन खान, रितेश देशमुख, संजय दत्त, अनिल कपूर, जॅकलीन फर्नांडिस आणि चंकी पांडे यांसारख्या अभिनेत्यांच्या नावाचा उल्लेख हाऊसफुल 5 बाबत होत असल्याची माहिती आहे. आणि आता या यादीमध्ये भिडू जॅकी श्रॉफ यांचा देखील समावेश झाला आहे.
हे देखील वाचा- साऊथ स्टार राणा दग्गुबातीने शाहरुख खानच्या पायाला केला स्पर्श, चाहते म्हणाले- ‘डाउन टू अर्थ सुपरस्टार…’
हाऊसफुल 5 कधी होणार रिलीज?
वास्तविक, हाऊसफुल 5 गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार होता. पण नंतर त्याची रिलीज डेट जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. परंतु आता ‘हाऊसफुल ५’ हा चित्रपट 6 जून 2025 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांना या चित्रपटाचा नवा अनुभव आणि नवी कॉमेडी पाहायला मिळणार आहे.