(फोटो सौजन्य-Instagram)
बी-टाऊनचा खिलाडी अक्षय कुमारने अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीला ब्लॉकबस्टर चित्रपटांचे मिळवून दिले आहेत. परंतु गेली काही वर्षे त्याच्या कारकिर्दीसाठी खूप वाईट जाताना नजर आलेली आहेत. सेल्फी, मिशन रानीगंज, बडे मियाँ छोटे मियाँ आणि सरफिराच्या अपयशानंतर अक्षय कुमारलाही ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे. 2022 सालापासून अक्षय कुमारचे नशीब बॉक्स ऑफिसवर चांगले राहिले नाही. ‘सरफिरा’च्या अपयशानंतर अक्षय कुमार ‘खेल खेल में’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांवर जादू करायला सज्ज झाला आहे. आता अभिनेत्या या ट्रोलिंगबाबत आपले मौन सोडले आहे आणि लोकांना प्रत्युत्तर दिले आहे.
अक्षय कुमारने ट्रॉलर्सला सुनावले
2 ऑगस्ट रोजी मुंबईत ‘खेल खेल में’चा ट्रेलर लाँच कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात अक्षय कुमारने ट्रोल्सना सडेतोड उत्तर दिले आहे. अक्षय म्हणाला, “मी कुठे गेलोय? मी इथेच आहे. मी काम करत राहीन. मी नेहमी काम करत राहीन. लोक काहीही म्हणले तरी मला काही फरक पडत नाही. मला सकाळी उठायचे आहे, व्यायाम करायचा आहे, कामावर जायचे आहे, परत यायचे आहे. काहीही असो. मी जे काही कमावतो.” ते स्वत: च्या हिमतीवर कमावले आहे, कोणाकडूनही काहीही मागितले नाही आहे. मी तोपर्यंत कमावणार जोपर्यंत मला गोळ्या घालत नाहीत.” असे तो या कार्यक्रमात म्हणाला.
अक्षय कुमारचे फ्लॉप चित्रपट
कोरोना महामारीनंतर अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. पण 2022 आणि 2023 हे वर्ष त्याच्यासाठी फारसे चांगले नव्हते. OMG 2 (हिट) आणि राम सेतू (सरासरी) वगळता इतर सर्व चित्रपट फ्लॉप झाले आहेत. तसेच अक्षय कुमारचा कॉमेडी अवतार मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना खूप आवडला आहे. या संदर्भात, आगामी ‘खेल खेल में’ हा चित्रपट अक्षय कुमारला पुन्हा बॉक्स ऑफिस किंग बनवेल, अशी अपेक्षा आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला असून तो खूप पसंत केला जात आहे. हा चित्रपट 15 ऑगस्टला स्त्री 2 आणि वेदासह थिएटरमध्ये दाखल होणार आहे.