(फोटो सौजन्य - अकाउंट)
सनी देओल त्याच्या पुढच्या अॅक्शन ड्रामा चित्रपट ‘जाट’ साठी सज्ज झाला आहे. आता अखेर निर्मात्यांनी चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर रिलीज केला आहे, ज्यामध्ये पुन्हा एकदा सनी देओलचा दमदार अॅक्शन अवतार पाहायला मिळणार आहे. ट्रेलर लाँच कार्यक्रमाला सनी देओल आणि रणदीप हुड्डा यांच्यासह चित्रपटाचे निर्माते देखील उपस्थित होते. या चित्रपटाचा टीझर पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. तसेच टीझरनंतर चाहते चित्रपटाची वाट पाहत आहेत.
कुणाल कामराच्या समर्थनार्थ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री उतरल्या मैदानात, काय म्हणाले सेलिब्रिटी ?
चित्रपटाचा ट्रेलर झाला प्रदर्शित
ट्रेलरच्या सुरुवातीला सनी देओलचा अॅक्शन अवतार पाहायला मिळत आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला, सैयामी खरे ही पहिली व्यक्ती आहे जी एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसते. गावात दहशतीचे वातावरण पाहून सैयामी विचारते काय झाले? या काळात सर्व गावकरी घाबरलेले आणि दुःखी दिसत असतात, तेव्हा एक मूल ‘रणतुंगा’ हे नाव घेताना दिसत आहे.
सनी देओलचा दमदार संवाद
सनी देओल ट्रेलरमध्ये येताच, सर्व गुंड त्याला मारण्यासाठी पुढे सरसावतात, परंतु अभिनेता त्यांच्यावर मात करतो. यादरम्यान, तो एक शक्तिशाली संवाद देखील देतो, ‘संपूर्ण उत्तरेने अडीच किलोच्या हाताची ताकद पाहिली आहे, आता दक्षिण ते पाहेल.’ असं म्ह्णून रणदीप हुड्डासोबत भांडतानाही दिसत आहे. अभिनेता रणदीप हुड्डा या चित्रपटामध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच या चित्रपटामध्ये चांगलीच स्टारकास्ट लोकांना पाहायला मिळणार आहे.
“भारतीयांच्या टॅलेंटला दुर्लक्षित…” ऑस्कर पुरस्कारांबद्दल दीपिका पादुकोण जरा स्पष्टच बोलली…
या दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
गोपीचंद मालिनेनी दिग्दर्शित ‘जाट’मध्ये विनीत कुमार सिंग, सैयामी खेर आणि रेजिना कॅसँड्रा यांच्या प्रमुख भूमिका दिसणार आहेत. मैत्री मूव्ही मेकर्स आणि पीपल मीडिया फॅक्टरी यांनी संयुक्तपणे निर्मित केलेला हा चित्रपट १० एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांना पाहता येणार आहे. हा चित्रपट रिलीज होण्याची वाट चाहते पाहत आहेत.