John Abraham net worth surges to Rs 251 cr not films or endorsements here’s how he made a fortune
दोन दशकांपासून हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारा जॉन अब्राहम आज अभिनयासोबतच चित्रपटांची निर्मिती करत आहे. जिस्म, धूम, गरम मसाला, न्यूयॉर्क, शूटआउट ॲट वडाळा यांसारख्या चित्रपटांमध्ये ॲक्शन आणि कॉमेडी दाखवणाऱ्या जॉनने एकेकाळी मीडिया प्लॅनर म्हणून काम केले होते. आणि आता तो सुप्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे.
जॉन अब्राहमने मीडिया प्लॅनर म्हणून काम करताना मॉडेलिंगलाही सुरुवात केली. एकदा तो एका मॉडेलिंग स्पर्धेचा देखील भाग होता, ज्याला शाहरुख खान, गौरी खान, करण जोहर यांनी जज केले होते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, जॉनने त्याच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून दिली आणि सांगितले की त्याचा पहिला पगार किती होता आणि तो थोड्या पैशांवर कसा जगायचा, पण म्युच्युअल फंडात तो बचत करत होता. या सगळ्याचा खुलासा अभिनेत्याने केला आहे जो ऐकून चाहत्यांना धक्का बसणार आहे.
जॉन अब्राहमचा पहिला पगार
रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टवर बोलताना अभिनेता म्हणाला, “एमबीएनंतर माझा पगार 6500 रुपये होता. मी तिथून सुरुवात केली. मी मीडिया प्लॅनर होतो. त्यानंतर मला ग्लॅडरॅग्ज स्पर्धेत भाग घेण्याची ऑफर मिळाली आणि माझा जज शाहरुख खान होता. गौरी खान आणि करण कपूर यांनी ती स्पर्धा जिंकली आणि त्यावेळी माझा 11,500 रुपये पगार होता.” असं अभिनेत्याने सांगितले.
जॉन अब्राहम कमी पैशात जगायचा
जॉन अब्राहमने सांगितले की तो प्रत्येक पैसा वाचवत असे आणि स्वतःवर कमी खर्च करत असे. तो म्हणाला, “माझा खर्च खूपच कमी होता. माझ्या दुपारच्या जेवणासाठी 6 रुपये खर्च होत असे आणि मी 2 चपात्या आणि डाळ फ्राय खायचो. ही गोष्ट 1999 ची आहे. मी रात्रीचे जेवण केले नाही कारण मला ऑफिसमध्ये उशिरापर्यंत काम करावे लागत होते. माझ्या खर्चात माझ्या बाईकसाठी पेट्रोल, मोबाईल फोन नाही, माझ्याकडे ट्रेनचा पास होता आणि थोडे जेवण, एवढेच. मी माझे पैसे बचत करत असे आणि इक्विटी आधारित म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायचो. इथूनच माझ्या करिअरची सुरुवात झाली.” असे जॉनने या मुलाखतीत सांगितले.
हे देखील वाचा- वेदाच्या ट्रेलर लाँचवेळी भडकला जॉन; तमन्नाने दिली प्रतिक्रिया
सध्या जॉन अब्राहम त्याच्या आगामी ‘वेद’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. शर्वरी वाघही ॲक्शन थ्रिलरमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट १५ ऑगस्टला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. या चित्रपटाचा धमाकेदार अनुभव चाहत्यांना घेता येणार आहे.