कंगना रणौत बॉलीवूडच्या विरोधात काहीही बोलण्याबाबत कधीही मागे राहत नाही. विशेषतः करण जोहर यांच्याबद्दल, ज्याच्याशिवाय इंडस्ट्रीची तुलना होऊ शकत नाही. तसेच अभिनेत्रीचा लवकरच ‘इमर्जन्सी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्रीने याचे प्रमोशन देखील सुरू केले आहे, पण तरीही ती हिंदी चित्रपटसृष्टीविरुद्ध बेधडक बोलताना दिसली आहे. कंगना बॉलिवूडमध्ये निगेटिव्ह पीआरबद्दल अनेकदा बोलली आहे. मॅशेबल इंडियाशी बोलताना अभिनेत्रीने पुन्हा एकदा बॉलिवूडवर निशाणा साधला. तिने सांगितले की, येथे प्रतिभावंतांची कदर केली जात नाही. कंगनाने तिला कसे वागवले जाते याचा खुलासा केला आहे.
कंगनाने पुन्हा बॉलिवूडवर साधला निशाणा
‘इमर्जन्सी’ संदर्भात वादात सापडलेली कंगना स्पष्टपाने आपले मत मांडून म्हणाली की, “माझ्यासोबत फक्त काही लोकांनाच समस्या आहे. तुम्ही बघितले तर मी निवडणूक जिंकली आणि मला इंडस्ट्रीकडून मिळणारे प्रेम हे माझे म्हणणे सिद्ध करते.” अभिनेत्री पुढे म्हणाली, “बॉलिवूड ही निराशाजनक जागा आहे. काही नाही होणार यांचं. एकतर कोणाच्याही टॅलेंटवर हे लोक जळतात टॅलेंट कोणी दिसल कि त्याच्या मागे लागतात आणि एकतर ते त्याला संपवतात किंवा त्याचे करिअर खराब करून टाकतात किंवा बहिष्कार घालतात. असे घाणेरडे पीआर करून ते त्यांचे नाव बदनाम करतात.” कंगनाने सांगितले की हे सर्व काही छुप्या पद्धतीने होत नाही तर उघडपणे घडते. असे अभिनेत्रीने सांगितले.
हे देखील वाचा- मालवणच्या पुतळा प्रकरणावर अभिनेता किरण मानेचं टीकास्त्र, म्हणाला, ‘काडीचीही सौंदर्यदृष्टी…’
‘इमर्जन्सी’ हा बायोपिक आहे का?
कंगनाने असेही स्पष्ट केले की ती इंदिरा गांधींची भूमिका साकारणार आहे, पण ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट तिचा बायोपिक नाही. हा चित्रपट ७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. सध्या याच्या रिलीजवर काहीसा वाद सुरू आहे. शीख संघटनेने चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर कंगनाला जीवे मारण्याच्या धमकीही दिली आहे. आता हा चित्रपट नक्की कधी रिलीज होणार हे अद्यापही समोर आले नाही आहे.