• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • Kiran Mane Post About Chhatrpati Shivaji Maharaj Statue In Malvan Scj

मालवणच्या पुतळा प्रकरणावर अभिनेता किरण मानेचं टीकास्त्र, म्हणाला, ‘काडीचीही सौंदर्यदृष्टी…’

मराठी अभिनेता आणि ठाकरे गटाचे नेते किरण माने यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून, पुन्हा एकदा शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याबद्दल राज्य सरकारवर या अभिनेत्याने टीका केली आहे. ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे सगळ्याचे लक्ष या शेअर केलेल्या पोस्टवर वेधले आहे. ही पोस्ट पाहून राज्य सरकार काही निर्णय घेईल का याकडे सगळ्या चाहत्यांचे लक्ष आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 28, 2024 | 10:34 AM
(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

२०२३ च्या डिसेंबर महिन्यात मालवण या ठिकाणी नौदल दिवस हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याचवेळी, मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. हा पूर्णाकृती पुतळा आता कोसळला आहे. याबाबत हळहळ व्यक्त करून किरण माने यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. अभिनेते आणि ठाकरे गटाचे नेते किरण माने यांनी याबाबत एक पोस्ट लिहून टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेनेचा ठाकरे गट आणि काँग्रेस यांनी राज्य सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. विरोधी पक्षांनी राज्य सरकार आणि या पुतळ्याचं अनावरण करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन हा पुतळा कशामुळे पडला याचे कारण सांगितले आहे. तसेच हा पुतळा राज्य सरकारने नव्हे तर भारतीय नौदलाने उभारला होता असे देखील त्यांनी सांगितले आहे. आजही देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकाचे राजकारण सुरु आहे अशी टीका केली आहे. तर किरण माने यांनी एक पोस्ट लिहून पुन्हा एकदा सरकारवर टीका केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)

किरण माने यांनी शेअर केलेली पोस्ट
“कुठल्याही कलेत सौंदर्यशास्त्राला खूप महत्त्वाचे स्थान आहे. शिल्पकलेत तर सर्वोच्च दर्जाचा ॲस्थेटिक सेन्स लागतो. छत्रपती शिवरायांसारख्या अद्वितीय महापुरूषाचं शिल्प बनवताना त्याचा कस लागतो. सातार्‍याच्या शिवतिर्थावर मी जेव्हा-जेव्हा जातो. तेव्हा या पुतळ्याला अर्धा-अर्धा तास निरखून बघत बसतो…माझ्या राजाचा तो रूबाब, तो डौल, नजरेची धार, करारी चेहरा, वार्‍यानं उडणारा अंगरखा, त्या अंगरख्यावरचा सुंदर कशिदा, ऐटीत पुढे ठेवलेला डावा पाय, त्या सणसणीत पिंडर्‍या, पायातल्या श्रीमंती मोजड्या, रूंद दणकट खांदे, बळकट पिळदार बाहू, पहाडासारखी छाती, मजबूत मुठीत घट्ट पकडलेली समशेरीची मुठ, तलवारीच्या म्यानावरचे अप्रतिम नक्षीकाम, मनगटापासून कोपरापर्यन्तचे ते संरक्षक कवच, सलवारीला पडलेल्या चुन्यांपासून दाढीचा आणि मिशीच्या एकेका केसापर्यन्त सगळं त्या शिल्पकारानं नजाकतीनं कोरलंय… मी ते सगळं डोळ्यांत साठवून ठेवतो.” असे किरण माने यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.

हे देखील वाचा- Suhasini Deshpande Dies : ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचे निधन, मराठी सिनेसृष्टीवर शोककळा

तसेच ते पुढे म्हणाले, “जेव्हा मी मालवणचा पुतळा पाहिला तेव्हाच लक्षात आलं होतं की या शिल्पकाराला काडीचीही सौंदर्यदृष्टी नाही. शिल्पकलेतल्या इयत्ता पहिलीतल्या ढ विद्यार्थ्याला वशिल्यानं हे काम मिळालं असावं बहुतेक. पण शेवटी महाराज हे महाराज आहेत. लहान मुलानं काढलेलं महाराजांचं वेडंवाकडं चित्र असलं तरी ते आदरानं कपाळाला लावणारे आम्ही… त्या पुतळ्यालाही लवून मुजरा केला होता. आज त्यामागचा सगळा भ्रष्टाचार कळतोय… त्या शिल्पामध्ये सौंदर्यशास्त्राबरोबरच उत्कृष्ट दर्जाच्या सामुग्रीचाही अभाव होता… इंजिनियरींग वगैरे काही अभ्यासच नव्हता. माझे जिवलग मित्र आणि देशातल्या मोजक्या नामवंत शिल्पकारांपैकी एक भगवान रामपुरे यांनी या घटनेचं तब्येतीत पोस्टमार्टेम करणारं विश्लेषण केलंय. एकंदरीत काय, तर सुमार दर्जाचे लोक सत्तेत बसल्यावर देशातल्या प्रत्येक गोष्टीला त्याच पातळीवर आणून ठेवतात, हेच खरं !” अशी पोस्ट किरण माने यांनी केली आहे. त्यांच्या या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा आहे. लोकांनी या पोस्टवर खूप प्रचंड प्रतिसाद देखील दिला आहे.

Web Title: Kiran mane post about chhatrpati shivaji maharaj statue in malvan scj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2024 | 10:31 AM

Topics:  

  • Chhatrapati Shivaji Maharaj
  • Kiran Mane
  • Malvan

संबंधित बातम्या

मशिदीत शिवाजी महाराज का आणतो? फ्रान्समध्ये ‘कान’ देऊन ऐकलेल्या ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
1

मशिदीत शिवाजी महाराज का आणतो? फ्रान्समध्ये ‘कान’ देऊन ऐकलेल्या ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

‘छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक नाव नाही…’, का संतापली ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता? Video व्हायरल
2

‘छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक नाव नाही…’, का संतापली ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता? Video व्हायरल

THANE: दिवा चौकाच्या नामांतरासाठी मनसे विभाग प्रमुख प्रकाश पाटील यांचा पुढाकार
3

THANE: दिवा चौकाच्या नामांतरासाठी मनसे विभाग प्रमुख प्रकाश पाटील यांचा पुढाकार

शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक वारसा लाभला, मात्र याचा फायदा काय?
4

शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक वारसा लाभला, मात्र याचा फायदा काय?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
तुझ्याकडे पैसे नसतील तर तुझ्या बायकोला…; पुण्यातील संतापजनक प्रकार उघडकीस

तुझ्याकडे पैसे नसतील तर तुझ्या बायकोला…; पुण्यातील संतापजनक प्रकार उघडकीस

‘पुन्हा हल्ला केल्यास विनाश…’ ; इराणच्या धर्मगुरुंची अमेरिका आणि इस्रायलला चेतावणी

‘पुन्हा हल्ला केल्यास विनाश…’ ; इराणच्या धर्मगुरुंची अमेरिका आणि इस्रायलला चेतावणी

Best Ropeway in India : आकाशातून निसर्ग पाहण्याचा अनोखा अनुभव घ्यायचा असेल तर ‘या’ आहेत भारतातील सर्वोत्तम Ropeway Rides

Best Ropeway in India : आकाशातून निसर्ग पाहण्याचा अनोखा अनुभव घ्यायचा असेल तर ‘या’ आहेत भारतातील सर्वोत्तम Ropeway Rides

Honda Activa साठी फक्त 3 हजार रुपयांचा EMI, कसे असेल संपूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग?

Honda Activa साठी फक्त 3 हजार रुपयांचा EMI, कसे असेल संपूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग?

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?

Controversies Films 2025: ‘बॅन’ ते एफआयआर आणि थिएटरमध्ये तोडफोड, जाणून घ्या कोणत्या चित्रपटांनी ओढवून घेतला वाद

Controversies Films 2025: ‘बॅन’ ते एफआयआर आणि थिएटरमध्ये तोडफोड, जाणून घ्या कोणत्या चित्रपटांनी ओढवून घेतला वाद

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.