मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (फोटो - सोशल मीडिया)
तपासात अडथळा आणल्याप्रकरणी हायकोर्टात ईडीची याचिका
हायकोर्टातील सुनावणी दरम्यान जोरदार खडाजंगी
14 जानेवारीला होणार पुढील सुनावणी
काल ईडीने पश्चिम बंगालमध्ये I- PAC मध्ये छापेमारी केली होती. या छापेमारीनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी छापेमारी सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणहूण पुरावे नेल्याचा आरोप ईडीने केला होता. तसेच याविरुद्ध ईडीने हायकोर्टात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी पार पडली आहे.या सुनावणीदरम्यान जोरदार खडाजंगी झाली असल्याचे समोर येत आहे.
नेमके प्रकरण काय?
ईडीने I-PAC चे प्रतीक जैन यांच्या कार्यालयावर छापेमारी केली. छापेमारी सुरू असतानाच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्या ठिकाणी दाखल झाल्या. त्यानंतर ईडीने पश्चिम बंगाल सरकारवर आणि खुद्द मुख्यमंत्री पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर पुरावे नेल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर ईडीने हायकोर्टात धाव घेतली होती. त्यावर आज सुनावणी पर पडली.
“ममता दीदी पुरावे घेऊन पळाल्या?” ‘त्या’ केसमध्ये ED ची हायकोर्टात धाव, केले गंभीर आरोप
कोर्टात काय घडले?
ईडीने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर पुरावे घेऊन गेल्याच तसेच तपासात अडथळा आणल्याबद्दल हायकोर्टात धाव घेतली. त्यावर आज कोर्टात सुनावणीदरम्यान खंडाजंगी झाली. त्यानंतर कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली आहे. न्यायमूर्तींच्या खंडपीठाने याचिकेवरील पुढील सुनावणी 14 जानेवारी रोजी ठेवली आहे.
कोर्टाच्या बाहेर गोंधळ
याचिकेवर सुनावणी सुरु असतानाच कोर्टाच्या बाहेर देखील टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचे समोर येत आहे. तसेच कोर्ट रूममध्ये देखील गोंधळ असल्याचे न्यायमूर्ती यांनी कोर्टरूममधून आपल्या चेंबरमध्ये जावे लागले असल्याचे समजते आहे.
“आमच्याशी लढायचे असेल तर…”; ED च्या ‘त्या’ छाप्यावरून ममता बॅनर्जींनी भाजपविरुद्ध ठोकला शड्डू
ममता बॅनर्जींनी भाजपविरुद्ध ठोकला शड्डू
आज ईडीने I-PAC कार्यालयावर छापेमारी केली. त्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ठेतया कार्यालयात दाखल झाल्या. तिथून त्यांनी भाजपवर टीका केली आहे. यंत्रणेच्या माध्यमातून बंगालचा डेटा आणि रणनीती चोरण्याचा प्रयत्न केला जात आहे. या कारवाईमुळे पश्चिम बंगालमध्ये जितक्या जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपने ठरवले होते ते आता शून्यावर येईल, अशी टीका त्यांनी भाजपवर केली आहे.
ज्या ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे, त्या ठिकाणी तृणमूल कॉँग्रेसच्या महिला नेत्यांनी बंगालचे राज्यगीत गाऊन अनोख्या प्रकारे निषेध व्यक्त केला. ममता बॅनर्जी म्हणाल्या, “आमच्याशी लढायचे असेल तर, लोकशाही पद्धतीने आम्हाला पराभूत करा. यंत्रणेच्या मागे लपू नका.” तपास यंत्रणा निवडणूक आणि आपल्या पक्षाशी संबंधित महत्वाचे कागदपत्र आणि कॉम्प्युटर आणि हार्डडिस्क जप्त करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला.






