kangana ranaut bjp mp mandi shares her political journey experiences and future aspirations
बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत सध्या सतत चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे तिचा आगामी चित्रपट ‘इमर्जन्सी’. शीख समुदायाने या चित्रपटाला सातत्याने विरोध केल्याने त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, आता याचदरम्यान बातम्या येत आहेत की अभिनेत्रीने तिचा पाली हिलचा बंगला विकला असून, तिचे १२ कोटीचे नुकसान झाले आहे.
कंगनाने घेतले होते कर्ज
नोंदणीच्या कागदपत्रांवरून ही माहिती मिळाली आहे की, वादग्रस्त संपत्ती असलेला हा बंगला अभिनेत्रीने 32 कोटी रुपयांना विकला आहे. सप्टेंबर 2017 मध्ये त्यांनी ही मालमत्ता 20.7 कोटी रुपयांना खरेदी केली होती. डिसेंबर 2022 मध्ये त्यांनी आयसीआयसीआय बँकेकडून 27 कोटी रुपयांचे कर्जही घेतले होते. हा बंगला त्याच्या प्रॉडक्शन हाऊस मणिकर्णिका फिल्म्सचे कार्यालय म्हणून वापरला जात होता.
खूप दिवसांपासून विकणार होती अभिनेत्री प्रॉपर्टी
गेल्या महिन्यात कोड इस्टेट नावाच्या यूट्यूब पेजने एका प्रॉडक्शन हाऊसचे कार्यालय विक्रीसाठी तयार असल्याचा व्हिडिओ देखील शेअर केला होता. प्रॉडक्शन हाऊस आणि मालकाचे नाव समोर आले नसले तरी व्हिडिओमध्ये वापरलेले फोटो पाहून हे कंगना रणौतचे ऑफिस असल्याचा अंदाज लोकांना आला होता. अनेक सोशल मीडिया यूजर्सनी कमेंट सेक्शनमध्ये जाऊन हे कंगनाचे घर असल्याची कमेंट केली. ही मालमत्ता तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे राहणाऱ्या कमलिनी होल्डिंग्जच्या भागीदार श्वेता बथिजा यांनी खरेदी केली आहे.
हे देखील वाचा- चित्रपट निर्माता आणि फॅशन आयकॉन मोझेज सिंगने अभिनय विश्वात केले पदार्पण!
मालमत्तावर बीएमसीचे होते लक्ष
कागदपत्रांनुसार, अभिनेत्रीचा बंगला 3,075 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला आहे आणि त्याची पार्किंग एरिया 565 स्क्वेअर फूट आहे. या कराराची नोंदणी 5 सप्टेंबर रोजी झाली असून त्यासाठी 1.92 कोटी रुपये मुद्रांक शुल्क आणि 30 हजार रुपये नोंदणी शुल्क भरण्यात आले आहे. ही तीच मालमत्ता आहे जी 2020 मध्ये BMC च्या छाननीखाली आली होती. सप्टेंबर 2020 मध्ये, बीएमसीने बेकायदेशीर बांधकामाचा हवाला देत कंगनाच्या वांद्रे येथील कार्यालयाचा काही भाग पाडला होता. मात्र, ९ सप्टेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर बांधकामे पाडण्याचे काम रखडले होते.