(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
चित्रपट निर्माते करण जोहरची आई हिरू जोहर या आज त्यांचा ८२ वा वाढदिवस साजरा करत आहेत त्यांच्या ८२ व्या वाढदिवशी, त्यांच्यासाठी त्यांचा मुलगा आणि बॉलिवूड सिनेमासृष्टील चित्रपट निर्माता करण जोहरने खास शुभेच्छा देऊन सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याचे गोंडस फोटो शेअर केले असून एक भावुक नोट देखील लिहिली आहे. ज्यामध्ये त्याने स्वतःचे मन मोकळे केले असून, आई त्याच “सर्वस्व” असल्याचे म्हटले आहे. त्याने गमतीने कबूल केले की, त्याच्या सर्व यशानंतरही, त्याला अजूनही लहान मुलासारखे फटकारले जाते. चला तर मग जाणून घेऊयात करणने या पोस्टमध्ये काय लिहिले आहे.
करण जोहरने आईसाठी लिहिली नोट
करण जोहरने आईसाठी शेअर केलेल्या पोस्टमध्ये असे लिहिले होते की, “असे म्हणतात की तुम्ही कितीही प्रसिद्ध झालात तरी, आई तुम्हाला नेहमीच पाठिंबा आणि आधार देते.” आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना करणने लिहिले, “माझी आई आज ८२ वर्षांची झाली… तिच्या पोटी जन्म घेण्याचा अभिमान आणि माझ्या मनात फक्त तिच्या विश्वाबद्दल कृतज्ञता आहे.” तो पुढे म्हणाला, “ती नेहमी मला चांगल्या गोष्टीसाठी फटकारते ती नेहमी मला कपड्यांबद्दल “तू काय घातले आहेस करण???” आणि फोनचा जास्त उपयोग केल्यावर “तू नेहमीच फोनवर असतोस.” असं म्हणून मला फटकारत असते.
“लय आवडतेस तू मला” मालिकेतील सरकार- सानिकाचा पारंपारिक अंदाज
पुढे त्याने लिहिले की, “पण ती माझं जग आहे, माझी आकाशगंगा आहे आणि आयुष्यासोबतची माझी मोठी प्रेमकहाणी आहे. आई माझं पहिला प्रेम आहे,” असे लिहून चित्रपट निर्माते करण जोहरने आईवरचे प्रेम व्यक्त केले आणि त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
बॉलिवूड कळकरांनी दिल्या शुभेच्छा
तसेच, हिरू जोहर यांना आलिया भट्ट, वरुण धवन, कियारा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा आणि टायगर श्रॉफ या सर्वानी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, संजय कपूर, निमरत कौर, सीमा सजदेह आणि इतरांनी कमेंट करून त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. करण जोहरचे त्याच्या आईवर खूप प्रेम आहे. तसेच धर्मा प्रॉडक्शन्सच्या प्रोजेक्ट्सच्या निर्मात्यांमध्ये हिरू जोहर यांची गणना होते. करण अनेकदा त्याच्या आईसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.
१३ वर्षे मोठ्या असलेल्या नसीरुद्दीन शाहवर रत्ना पाठक यांचं कसं जडलं प्रेम; वाचा भन्नाट लव्हस्टोरी
करणचे आगामी प्रोजेक्ट
करणचा धर्मा प्रॉडक्शन अनेक आगामी प्रोजेक्ट्सवर काम करत आहे, ज्यात ‘धडक २’, ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’, कार्तिक आर्यनसोबतचा पुढील चित्रपट चांद मेरा दिल आणि बऱ्याच चित्रपटाचे काम सुरु आहे. जे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. २०२३ मध्ये प्रदर्शित झालेला त्यांचा शेवटचा दिग्दर्शन ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट होता.