कलर्स मराठीवरील "# लय आवडतेस तू मला" मालिकेत सरकार- सानिका एकामागोमाग एक अशा येणाऱ्या अनेक संकटांना खंबीरपणे सामोरे जाताना दिसत आहेत. अशातच आज होळी सणाच्या निमित्त सरकार – सानिकाने खास फोटोशूट केले आहे. सरकार- सानिकाने मालिकेच्या शुटिंग दरम्यान मराठमोळा लूक वेअर केलेला होता. त्यांनी दोघांनीही खास रोमँटिक पोजेस देत सर्वांचे लक्ष वेधले. कायमच मालिकेमध्ये आपल्या साधेपणाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या सरकार- सानिकाने रोमँटिक फोटोंनी लक्ष वेधलेय. सध्या त्यांचे सेटवरील शुटिंग दरम्यानचे फोटो तुफान व्हायरल होत आहे.
Sarkar Sanika Traditional Look
"#लय आवडतेस तू मला" मालिकेतील सरकार- सानिकाचा पारंपारिक अंदाज, जोडीचं होतंय गावभर कौतुक
सरकारने डिझायनिंग व्हाईट कलरचा कुर्ता आणि पँट वेअर केले आहे. तर त्यावर क्रिम कलरची पारंपारिक टोपी वेअर केलेली आहे. अभिनेता पारंपारिक लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तर, सानिकाने निळ्या रंगाची नऊवारी, गुलाबी रंगाचा ब्लाऊज आणि त्यावर चॉकलेटी रंगाची ओढणी असा लूक वेअर केलेला आहे.
दरम्यान, सानिकाने पारंपारिक लूकवर लूकला साजेसे दागिने वेअर केले आहेत. त्यासोबतच नाकात नथ, केसात गजरा आणि लूकला साजेसा मेकअप करत सर्वांचेच लक्ष वेधले. अभिनेत्री व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे नेटकरी करीत आहेत.
कलर्स मराठीवर टेलिकास्ट होणाऱ्या "# लय आवडतेस तू मला" मालिकेला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळत आहे. त्याप्रमाणेच सरकार- सानिकाच्या जोडीलाही दमदार प्रतिसाद मिळत आहे. दोघांच्याही लूकचे नेटकरी तुफान कौतुक करत आहेत.
सरकार- सानिकाच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.