(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘पिंगा गं पोरी पिंगा’ प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या एका महत्त्वपूर्ण वळणावर आली आहे. या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. तसेच नुकत्याच झालेल्या मालिकेच्या भागात वल्लरी आणि तिचा पती मनोजमध्ये भांडण झालेले दिसून आले आहे. आणि हे भांडण इतके मोठे झाले की ते आता घटस्फोट घेणार का? हा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
घरामध्ये गणपतीची आरती सुरू असतानाच वल्लरी आणि मनोजमध्ये झालेला तात्विक वाद आता एवढा तीव्र झाला आहे की त्याने संपूर्ण घरच्यांच्या आयुष्याला वेगळं वळण दिलं आहे. वल्लरी स्पष्टपणे मनोजला सांगते की भ्रष्टाचार करून मिळवलेले पैसे तिला मान्य नाहीत आणि अशा पैशावर हे घर चालू नये. मनोजच्या चुकीच्या मार्गाचा निषेध करत ती त्याच्याविरुद्ध केस दाखल करण्याचा मोठा निर्णय घेते. यामुळे संपूर्ण घर वल्लरीच्या विरोधात उभं राहतं. जिथं एकीकडे सर्वजण मनोजच्या बाजूने जातात, तिथं न्यायासाठी एकटी लढणारी वल्लरी प्रेक्षकांना एक लीडर शैली दाखवते. पण इंदुमतीच्या सांगण्यावरून वल्लरी मनोजला घटस्फोट देणार का ? मालिकेत पुढे काय घडणार जाणून घेण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत.
घरातील मतभेद अजूनच टोकाला जाताना नव्या भागामध्ये दिसणार आहे. इंदु आणि वल्लरीमध्ये मनोजवरून मोठा वाद होतो. गुरूस्थानी असलेल्या नानावटी सरांनी सुद्धा वल्लरीला शांत होण्याचा, घरातील ऐक्य जपण्याचा सल्ला दिला. मात्र वल्लरी ठामपणे आपलं कर्तव्य निवडते. या धाडसी भूमिकेमुळे नानावटी सर तिच्यावर राग न धरता उलट अभिमान व्यक्त करतात. याच काळात सगळ्यांना धक्का बसतो जेव्हा वल्लरीला समजतं की सानिकाकडून घरातल्या काही लोकांनी पैसे घेतले आहेत.
‘आई तुळजाभवानी’ मालिकेचा सुरु झाला नवा अध्याय, ‘या’ अभिनेत्रीने केली एन्ट्री
यानंतर ती सगळ्यांना खडसावून सांगते, “माझ्या अशिलकडून कोणीही पैसे घ्यायचे नाहीत!” या वक्तव्याने घरातील तणाव आणखी वाढतो. दरम्यान, मनोजच्या आयुष्यात एक मोठं सत्य समोर येतं त्याला एक आजार झाला आहे की जो कधीच बरा होऊ शकणार नाही. या परिस्थितीत तो प्रचंड खचतो आणि शेवटी घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सही करतो. मात्र ही सही मनोजने स्वतःच्या मनाप्रमाणे केली का, की खरेतर इंदुमतीच्या सांगण्यावरूनच मनोज हा निर्णय घेतो? हे येणाऱ्या भागात प्रेक्षकांना दिसणार आहे.