(फोटो सौजन्य - अकाउंट)
बॉलिवूडमध्ये अफेअर्स आणि ब्रेकअपच्या कथा सामान्य आहेत. पण या कथांमध्ये कोणाचे नाव कोणाशी जोडले जात आहे हा चर्चेचा विषय बनतो. सध्या कार्तिक आर्यन आणि श्रीलीला त्यांच्या प्रेमसंबंधांच्या अफवांमुळे चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे. कार्तिकने स्वतः त्यांच्या ताज्या पोस्टद्वारे या चर्चांना अधिक मार्ग दिला आहे. कार्तिक आर्यन सोशल मीडियावर सक्रिय असतो आणि अनेकदा त्याच्या पोस्टने चाहत्यांना आश्चर्यचकित करतो. अलीकडेच त्याने श्रीलीलासोबतचा त्याचा रोमँटिक फोटो शेअर केला, त्यानंतर पुन्हा एकदा अफवांना उधाण आले आहे.
चाहत्यांना वाटत आहे की अभिनेता खरोखर प्रेमात आहे, तर हे पूर्णपणे खरे नाही. कार्तिक आर्यन आणि श्रीलीला लवकरच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. कार्तिकने अलीकडेच सह-अभिनेत्री श्रीलीलासोबतचा चहाच्या डेटचा फोटो शेअर केला आहे, ज्यामुळे चाहते त्यांच्या ऑन-स्क्रीन जोडीबद्दल अधिक उत्सुक आहेत.
विराट कोहलीचे अभिनयात पदार्पण? ‘या’ प्रोजेक्टमध्ये दिसणार क्रिकेटर; व्हायरल फोटोमागील सत्य काय?
कार्तिक श्रीलीलाच्या प्रेमात पडला
हे जोडपे अनुराग बसूच्या आगामी चित्रपटातून पदार्पण करणार आहे, जो २०२५ च्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे शीर्षक अद्याप निश्चित झालेले नाही आणि अभिनेत्याने शेअर केलेला हा फोटो याच चित्रपटाचा भाग आहे. रोमँटिक चित्रात, कार्तिक आणि श्रीलीला एका चहाच्या बागेत बसले आहेत आणि कार्तिक श्रीलीलाच्या डोळ्यात प्रेमाने पाहत आहे.
‘तू मेरी जिंदगी है’
कार्तिक आर्यनने नुकताच इंस्टाग्रामवर श्रीलीलासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या चित्रात कार्तिक श्रीलीलाकडे पाहत असल्याचे दिसते, तर श्रीलीला खाली पाहत आहे आणि विचारात हरवलेली दिसते. हिरवळीच्या परिसरात वसलेले हे ठिकाण रोमँटिक ‘चाय डेट’चे वातावरण ताजे करत आहे. पोस्टला कॅप्शन देताना कार्तिकने लिहिले, “तू मेरी जिंदगी है.” असे लिहून अभिनेत्याने ही पोस्ट शेअर केली आहे.
चाहत्यांनी दिला प्रतिसाद
हा फोटो पाहून आता चाहते चकित झाले आहेत, त्याचे चाहते त्यांच्या प्रेमकथेची आतुरतेने वाट पाहत आहेत. अनेक चाहते भरभरून कमेंट करून प्रतिसाद देत आहे. एका यूजर्सने लिहिले की, ‘या चित्रपटात तुम्हा दोघांमधील केमिस्ट्री पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.’ तर आणखी एकने लिहिले, ‘आता आशिकीची वाट पाहत नाहीये.’ दुसरा म्हणाला, ‘हा एक हिट बॉस ऑफिस चित्रपट आहे.’ असे लिहून चाहत्यांनी प्रतिसाद दिला आहे.