Internet Found Indian Cricketer Virat Kohli Doppelganger Turkish Actor Cavit Cetin On Reddit Post Goes Viral
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा नवरा आणि भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सध्या विराट चर्चेत येण्यामागील कारण म्हणजे, त्याचं फिल्म इंडस्ट्रीतील डेब्यू…. तुर्की अभिनेता Cavit Çetin Güner चा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्हायरल फोटोतील त्याचा चेहरा आणि विराटचा चेहरा एकमेकांशी साधर्म्य असल्याचं बोलले जाते आहे. सध्या सोशल मीडियावर तुर्की अभिनेता कॅव्हिट चेटिन गुनरचा फोटो तुफान व्हायरल होत असून त्यामुळे इंटरनेटवर याबाबत जोक्स आणि चर्चा सुरू झाल्या आहेत.
सलमान खानच्या वडिलांना ‘सिकंदर’ चित्रपट कसा वाटला ? सलीम खान यांनी डायलॉगबद्दल केले महत्वाचे विधान
तुर्की अभिनेत्याचा चेहरा हुबेहूब विराट कोहलीसारखा दिसत असल्यामुळे इंटरनेटवर याबाबत असंख्य जोक्स सुरू आहेत. रेडिट युजरने कॅव्हिटचा हा फोटो शेअर केला आहे. Diriliş: Ertuğrul (दिरिलिस: एर्तुग्रुल) या तुर्कीश ड्रामा सीरिजमधील हा फोटो असून कॅव्हिट आणि विराट यांच्यातील साधर्म्यामुळे क्रिकेटपटूच्या चाहत्यांनी कमेंट करत आश्चर्य व्यक्त केले. अनेकांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. रेडिट युजरने या टीव्ही सीरिजमधील फोटो शेअर करत म्हटले की, ‘अनुष्का शर्माच्या पतीचे अभिनयात पदार्पण’ या कॅप्शनसह फोटो शेअर करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. पण नीट पाहिल्यास हा फोटो विराटचा नसून कॅव्हिट नावाच्या अभिनेत्याचा हा चेहरा आहे हे लक्षात येते. या फोटोमध्ये कॅव्हिटच्या पात्राने टोपी घातली असून त्याच्या हातात काहीतरी दिसते आहे.
Siddharth Jadhav : सेम टू सेम दिसणारे सुपरस्टार सिद्धार्थ जाधवचा भाऊ कोण आहे? काय आहे त्यांची ओळख?
याआधीही २०२० मध्ये हा फोटो व्हायरल झाला होता. यानंतर, आता २०२५ मध्ये पुन्हा एकदा या फोटोने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “हा विनोद नाही. मी पहिल्यांदा या मालिकेतील डोगन बे या पात्राला पाहिले तेव्हा मला वाटले, विराट कोहली तुर्की मालिकेत काय करतोय?” दुसऱ्या नेटकऱ्याने चक्क अनुष्का शर्माला टॅग करत म्हटले, “अनुष्का, तुझा नवरा खरंच टीव्हीवर आला आहे का?” तर काहींनी लिहिले, “नेपोटिझम आता हाताबाहेर गेले आहे.”, “भयावह”, “एकासारखेच पण वेगळे”, “हा हॉलिवूडमध्ये कसा काय पोहोचला ?” सह अशा वेगवेगळ्या कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
सेलिब्रिटी ‘गुढीपाडवा’…, मराठमोळे कलाकार कसे सेलिब्रेट करतात मराठी नववर्ष ?
‘दिरीलिश: एर्टुगरुल’ ही मालिका मेहमेत बोजदाग यांनी तयार केली असून ऐतिहासिक साहसी सीरीज प्रकारातील आहे. १३ व्या शतकातील एर्तुग्रुल बे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ह्या मालिकेत मुख्य भूमिकेत एन्गिन अल्टान डुझ्याटन असून, कॅव्हिट एक महत्त्वाची भूमिका साकारतो आहे. याशिवाय केतिन गुनेर, कान तासनर आणि हुल्या डार्कन आहेत. ही मालिका ओटोमन साम्राज्याचे संस्थापक उस्मान प्रथम यांचे वडील एर्टुगरुलच्या जीवनावर आधारित आहे. २०१४ साली आलेली ही मालिका २०१९पर्यंत ५ सीझन चालली.