(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
कॉमेडियन कपिल शर्मा गेल्या काही काळापासून त्याच्या नवीन शो ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या आठवड्यात नवज्योत सिंग सिद्धू पत्नी नवज्योत कौरसह शोमध्ये पाहुणे म्हणून येणार आहेत. त्याच्याशिवाय क्रिकेटर हरभजन सिंगही त्याची पत्नी गीता बसरासोबत या शोमध्ये दिसणार आहे. नवज्योत सिंग सिद्धू जवळपास 5 वर्षांनी कपिल शर्माच्या शोमध्ये प्रवेश करणार आहेत, तर एक काळ असा होता जेव्हा ते कपिलच्या शोचे जज होते. आता हे समोर आले आहे की त्यांनीअचानक कपिल शर्माच्या शोला अलविदा का केले होते.
2019 मध्ये शोपासून दूर राहिले
नवज्योत सिंग सिद्धू कपिल शर्माचा जुना शो ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ जज करत होते. 2019 मध्ये ते या शोपासून दुरावले. यानंतर अर्चना पूरण सिंह यांनी जज म्हणून या शोमध्ये प्रवेश केला. ‘द ग्रेन टॉक’शी झालेल्या संवादात सिद्धूने कपिलसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला. ते म्हणाले की ते कपिलच्या शोच्या अनेक आवृत्त्यांशी संबंधित आहे. त्याचा शो देवाने तयार केलेल्या गुलदस्त्यासारखा आहे. येथे प्रत्येक सदस्याने शोमध्ये स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे.
कपिल शर्मा शोबाबत बातमी वाचण्यासाठी इथे क्लीक करा
शो सोडण्यामागचे कारण काय होते?
नवज्योतसिंग सिद्धू यांना जेव्हा विचारण्यात आले की त्यांनी कपिल शर्माचा शो अचानक का सोडला, तेव्हा सिद्धू यांनी उत्तर दिले, ‘शो सोडण्यामागे राजकारण हे कारण होते. मला आत्ता त्याबद्दल बोलायचे नाही. त्यावेळी इतरही अनेक कारणे होती आणि गुलदस्ता तुटला गेला होता.’ असे त्यांनी सांगितले.
5 वर्षांनी परत येईल
या संवादादरम्यान सिद्धू यांनी त्यांची एक इच्छा सांगितली, ‘माझी इच्छा होती की, हा गुलदस्ता पूर्वीप्रमाणे एकत्र यावेत. तर, कपिल शर्माचा शो चांगला चालला आहे. तो खूप अद्भुत आहे.’ तसेच जेव्हा सिद्धू यांनी कपिलचा शो सोडला, तेव्हा पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या वेळी केलेल्या एका कमेंटमुळे तो वादात सापडला होता. कदाचित याच कारणामुळे ते या शोपासून दुरावले. आता तब्बल ५ वर्षांनंतर चाहत्यांना नवज्योत सिंग सिद्धू आणि कपिल शर्मा एकत्र पाहायला मिळणार आहे.