(फोटो सौजन्य - x अकाउंट)
धनुष हा दक्षिण चित्रपटसृष्टीत अभिनय आणि दिग्दर्शनाची जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडण्यासाठी ओळखला जाणारा अभिनेता आहे. ‘निलावुक्कु एनमेल एन्नाडी कोबम’ या चित्रपटाद्वारे त्याने दिग्दर्शक म्हणून पुनरागमन केले आहे. त्याचा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे आणि ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चाहत्यांमध्ये त्याची क्रेझ दिसून येत आहे. चला तर मग जाणून घेऊया की धनुषचा बहुप्रतिक्षित चित्रपट लोकांच्या अपेक्षा पूर्ण करतो की नाही. आणि या चित्रपटाला किती प्रतिसाद मिळाला आहे.
Chhaava: चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर तुफानी कमाई; पहिल्या आठवड्यात केला २०० कोटींचा गल्ला पार!
चित्रपटाची कथा काय आहे?
धनुषच्या ‘नीक’ या चित्रपटामध्ये नातेसंबंध, ब्रेकअप आणि रिबाउंड्स उत्तम प्रकारे चित्रित केले आहेत. या पिढीतील तरुणांना चित्रपटाशी अधिक खोलवर जोडता येईल, त्यामुळे चित्रपटाच्या कथेचा प्रभाव जनरेशन झेडवर अधिक पडू शकतो. सुरुवातीच्या प्रतिक्रियांमध्ये चित्रपटाचे कौतुक होत आहे. तसेच या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे.
धनुषच्या चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळत आहे?
धनुष दिग्दर्शित हा चित्रपट पाहिल्यानंतर लोकांनीही आपले मत मांडायला सुरुवात केली आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, ‘हा एक मस्त आणि मनोरंजक चित्रपट आहे.’ दुसऱ्या एका वापरकर्त्याने प्रतिक्रिया दिला, ‘हा एक रोमँटिक-कॉमेडीचा चित्रपट आहे ज्याची कथा साधी आणि संबंधित आहे.’ धनुषने कथानक हलकेफुलके ठेवले आहे आणि मॅथ्यू थॉमस त्याच्या एका ओळीने प्रेक्षकांचा आवडता झाला आहे.
१३ वर्षांच्या डेटिंगनंतर प्राजक्ता कोळी करणार लग्न; या दिवशी बांधणार प्रियकरासोबत रेशीमगाठ!
काही प्रेक्षकांना चित्रपटाचा क्लायमॅक्सही आवडला आहे. एका वापरकर्त्याने चित्रपटाबद्दल लिहिले की, ‘नीकला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आणि हा चित्रपट पाहताना खूप छान वाटले.’ याशिवाय, बहुतेक लोक म्हणतात की पहिला भाग उत्तम आणि मुक्त आहे. धनुषने एक हलकाफुलका रोमँटिक-कॉमेडी चित्रपट बनवला आहे, जो एका सामान्य मुलाची आणि एका उच्चवर्गीय मुलीची प्रेमकथा दाखवतो आहे.
चित्रपटातील जबरदस्त स्टारकास्ट
धनुष, कस्तुरी राजा आणि विजयालक्ष्मी कस्तुरी निर्मित ‘नीक’ या चित्रपटात अनेक लोकप्रिय कलाकारांनी काम केले आहे. यात पाविश, मॅथ्यू थॉमस, अनिखा सुरेंद्रन, प्रिया प्रकाश वॉरियर, वेंकटेश मेनन, राबिया खातून आणि रम्या रंगनाथन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हे सगळे कलाकार खूप मस्त काम करताना दिसले आहे. या सगळ्यांचे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस आले आहे.