फोटो सौजन्य: सोशल मीडिया
जगभरात एकापेक्षा एक अनेक कॉमेडियन आहेत. त्यापैकी एक प्रसिद्ध कॉमेडियन म्हणजे कपिल शर्मा त्याचा कॉमेडी शो घेऊन पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लीक्सवरील दी ग्रेट कपिल शर्मा शोच्या माध्यमातून लोकांना हसवण्याचे काम करतो. आता या शोचा पहिला सिझन संपला आहे. कपिल शर्मा त्याचा क्वॉलीटी टाइम स्पेंड करत आहे. नुकताच सोशल मीडियावर त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात तो विमान उडवताना दिसत आहे.
या व्हिडीओला त्याने कॉमेडी स्टाईलमध्येच कॅप्शन दिले आहे. ‘आज विमान तुमचा भाऊ उडवणार आहे.’ असं या कॅप्शनमध्ये त्याने लिहलं आहे. कपील शर्मा को-पायलट सीटवर बसलेला या व्हिडीओत दिसत आहे. त्या मागे असलेली व्यक्ती आजूबाजूची दृश्ये कॅमेरात कैद करत असताना कपिल हसताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये विमानाच्या टेकऑफपासून ते लॅंडिंगपर्यतचे दृश्ये कॅप्चर केली आहेत. व्हिडीओला अनेक लोकांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.
नेटकऱ्यांनी घेतली फिरकी
एका नेटकऱ्याने लिहिले की, ‘सर भाभी जी को कहाँ छोड़ दिए आप? घर जाईये, ये आपके लिये अच्छा नही है!’. दुसऱ्याने लिहिले की, ‘बघा, ते लाल बटण दाबू नका.’ तर एका युजरने लिहिले की, ‘पाजी लँड करायला येतं ना?’ कपिल शर्माच्या एका फॉलोअरने त्याच्या पोस्टवर लिहिलं की, ‘विमान पण गंमतीत उडू लागलं.’ आणखी एका युजरने लिहिले की, ‘पाजी आज एक पेग जास्त झाला आहे का?’ एका युजरने मजेशीर स्टाईलमध्ये लिहिलं की, ‘सावकाश पाजी. आम्ही पुढच्या भागाची वाट पाहत आहोत.’ अशा भन्नाट कमेंट्स या व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये लोकांनी केल्या आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर कपिल शर्मा परत दिसणार आहे. त्याचा एक नवीन शो येत असून सुनील ग्रोव्हर सोबत तो दिसणार आहे.