आशा भोसलेंची हायकोर्टात धाव (फोटो- ट्विटर)
जगभरात वाढला एआयचा वापर
एआयमुळे अनेक लोकांना बसतोय फटका
आशा भोसले यांची हायकोर्टात याचिका
जगभरात एआय म्हणजेच (Artificial Intelligence) खूप प्रगत तंत्रज्ञान सर्वांसाठी खुले झाले आहे. त्याचे जसे चांगले फायदे आहेत तसेच त्याचे तोटे देखील समोर येताना दिसून येत आहेत. एआयचा अनेक जणांना फटका बसत आहे. याचा फटका सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना देखील बसला आहे. आशा भोसले या प्रकरणी हायकोर्टात धाव घेतली आहे.
आशा भोसले यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. एआय टेक्नॉलॉजीचा फटका बसला आहे. आशा भोसले यांनी एआय विरुद्ध हायकोर्टात धाव घेतली आहे. अमेरिकेतील काही एआय प्लॅटफॉर्म यांनी आशा भोसले यांचा आवाज, त्यांची गायन शैली यांचा जसाच्या तसा वापर करत आपल्या रेकॉर्डिंगमध्ये बेकायदा उपयोग केल्याचे समोर आले आहे.
दरम्यान सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी या दोन्ही एआय प्लॅटफॉर्मविरुद्ध मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. वैयक्तिक हक्काच्या रक्षणासाठी आशा भोसले यांच्या वकिलांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. दाखल करण्यात आलेल्या याचिकेची गंभीर दखल हायकोर्टाने घेतली आहे. आशा भोसले यांना अंतरिम दिलासा देण्याबाबत लवकरच आदेश दिले जातील असे हायकोर्टाने म्हटल्याचे समोर येत आहे.
आशा भोसलेंबद्दल जाणून घ्या
आशा भोसले नऊ वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे अचानक निधन झाले. आशा त्यांच्या मोठ्या बहिणी लता मंगेशकर आणि कुटुंबासह पुण्याहून मुंबईत आल्या. दोन्ही बहिणींनी चित्रपटांमध्ये गाणं गाण्यास सुरुवात केली. आशा भोसले यांनी त्यांचे पहिले गाणे ‘माझा बाळ’ (१९४३) या मराठी चित्रपटात गायले. त्यांनी ‘चुनरिया (१९४८)’ या बॉलीवूड चित्रपटात ‘सावन आया’ हे गाणे गायले. तेव्हापासून आशा भोसले संगीताच्या जगात सक्रिय आहेत.
लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या कारकिर्दीत हळूहळू प्रगती होत होती. अचानक, वयाच्या १६ व्या वर्षी आशा भोसले यांनी लता मंगेशकर यांचे सेक्रेटरी गणपत राव भोसले यांच्याशी लग्न केले. गणपत राव आशांपेक्षा २० वर्षांनी मोठे होते. लता मंगेशकर आणि त्यांच्या कुटुंबाला हे नाते स्वीकारले नाही. यामुळे आशा आणि लता मंगेशकर यांच्या नात्यात अंतर निर्माण झाले, जे बराच काळ टिकले. आशा भोसले यांनी एका मुलाखतीत त्यांच्या पहिल्या लग्नाबद्दल म्हटले होते की, ‘माझ्या पतीचे कुटुंब रूढीवादी होते, ते एका गायन स्टारला स्वीकारू शकत नव्हते. जेव्हा मी माझा धाकटा मुलगा आनंदला जन्म देणार होते, तेव्हा कुटुंबाने मला माझ्या पालकांच्या घरी परतण्यास सांगितले.’ आशा भोसले आणि गणपत राव यांचे लग्न टिकले नाही, ते ११ वर्षांनी वेगळे झाले. आशा भोसले यांना गणपत रावपासून तीन मुले झाली.