सूरज चव्हाणने मागितली चाहत्यांची माफी, अंकिता आणि जान्हवीचं नाव घेत मागितली माफी; नेमकं काय घडलं ?
‘बिग बॉस मराठी ५’चा विजेता सूरज चव्हाण सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनून राहिला आहे. सूरजने बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरल्यानंतर त्याचे सर्वत्र कौतुक झाले. शो संपल्यावर कार्यक्रमातील सहस्पर्धक जान्हवी किल्लेकर, धनंजय पोवार, अंकिता वालावलकर आणि तिचा होणारा पती, वैभव चव्हाण आणि इरिना रुडाकोव्हा हे सर्व स्पर्धक सूरजला भेटण्यासाठी त्याच्या गावी गेले होते. सूरजच्या गावी हे सर्व कलाकार गेले म्हटल्यावर यांनी सर्वांनी त्याच्यासोबत इन्स्टाग्रामवर फोटो- व्हिडिओतर शेअर केले होते. त्याच्यासोबत केलेली धमाल मस्ती असो किंवा त्याच्या काढलेले रिल आणि फोटो आता सूरज चव्हाणच्या अकाऊंटवरून डिलीट झाल्या आहेत.
स्वत: सूरज चव्हाणने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सूरज चव्हाणने चाहत्यांची माफी मागितली आहे. शेअर केलेल्या इन्स्टा स्टोरीमध्ये सूरज चव्हाण माफी मागताना म्हणाला, “नमस्कार मी आपल्या सर्वांचा महाराष्ट्राचा लाडका सुरज चव्हाण माझ्या इन्स्टाग्राम अकाऊंट वरती काही प्रॉब्लेम असल्यामुळे काही खुप महत्वाच्या पोस्ट्स डिलीट झाल्या आहेत त्यामध्ये माझ्या अंकिता ताई आणि जान्हवी ताई च्या पण होत्या !! यापुढे मी स्वतः लक्ष देईल आणि काळजी घेईल तरीही आपणा कुणाचे मन दुखावले असतील तर मोठ्या मनाने मला माफ करा !! आपलाच सुरज चव्हाण” सूरजच्या अकाऊंटवरून अचानक पोस्ट कशा काय डिलीट झाल्या ? अशी सर्वत्र चर्चा होत असताना स्वत: सूरज चव्हाणच्या पीआर टीमने सोशल मीडियावर स्पष्टीकरण दिलंय.
सूरज चव्हाणने मागितली चाहत्यांची माफी, अंकिता आणि जान्हवीचं नाव घेत मागितली माफी; नेमकं काय घडलं ?
सूरज चव्हाणचे शिक्षण पूर्ण न झाल्यामुळे त्याचे सोशल मीडिया त्याचा भाचा आणि त्याचे काही जवळचे मित्र हँडल करतात. त्यांनीच सूरज चव्हाणच्या इन्स्टाग्राम हँडलवरून अकाऊंटचा प्रॉब्लेम झाल्याची माहिती दिली आहे. यापूर्वीही सूरज चव्हाणसोबत एक धक्कादायक प्रकार घडला होता. सूरज चव्हाणत त्याचं फेक अकाऊंट क्रिएट करून चाहत्यांची आर्थिक फसवणूक केली होती. सूरजला ही गोष्ट कळताच, त्याने अशा आर्थिक फसवणूकीला बळी पडू नका असं आवाहन आपल्या चाहत्यांना केलं होतं.
हे देखील वाचा- धडाकेबाज रोमँटिक अॅक्शनपट ‘नाद – द हार्ड लव्ह’ १५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार…