(फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)
अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या घरी सध्या खूप उत्साह सुरु आहे. कारण अभिनेत्रीचा भाऊ लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. प्रियांकाचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा आणि नीलम उपाध्याय लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. दोन्ही कुटुंबांमध्ये लग्नाच्या विधी सुरू झाल्या आहेत. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत आहेत. नीलमने आधीच तिच्या हातावर सिद्धार्थच्या नावाची मेहंदी लावली आहे, तर सिद्धार्थच्या घरी माता राणीच्या पूजेसह लग्नाचे विधी कार्यक्रम सुरू देखील झाले आहेत. ज्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
माता राणीच्या पूजेने केली विधीला सुरुवात
प्रियांका चोप्राची आई मधु चोप्रा यांनी लग्नाच्या विधींचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी त्यांच्या मुलाचे आणि भावी सुनेचे जग आनंदाने भरून जावो अशी प्रार्थना माता राणीकडे केली आहे. मधु चोप्रा यांनी लिहिले, ‘लग्न समारंभ श्रद्धेने सुरू होतात. या जोडप्याला देवी माता आशीर्वाद देवो. आनंद, प्रेम आणि समृद्धी दे.’ असे लिहून त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. तसेच या लग्न सभारंभाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
प्रियांका चोप्रा एथनिक लूकमध्ये छान दिसली
मधु चोप्रा पुढे लिहितात, ‘मित्र आणि कुटुंबाच्या उपस्थितीने हा प्रसंग अधिक खास बनवला’. छायाचित्रांमध्ये मधु चोप्रा आणि कुटुंबातील सदस्य पूजा करताना दिसत आहेत. प्रियांका चोप्रा एथनिक लूकमध्ये खूपच सुंदर दिसते आहे. तर, अभिनेत्रीची आई मधु चोप्रा गुलाबी रंगाच्या पोशाखात सुंदर दिसल्या. तसेच या लग्न सोहळ्याची धमाल चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.
प्लॅनेट मराठीच्या अक्षय बर्दापूरकर यांच्यावर फसवणुकीचा आरोप, तक्रार दाखल; नेमकं प्रकरण काय?
नीलमच्या हातावर सिद्धार्थच्या नावाची मेहंदी
वधूच्या घरातही उत्साहाचे वातावरण आहे. नीलमच्या घरातील मेहंदीचा सोहळा पूर्ण झाला आहे. काल, मंगळवारी, प्रियांका चोप्रा आणि वराच्या बाजूचे इतर सदस्य वधूच्या घरी मेहंदी घेऊन गेले. हे सगळे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल आहे. नीलम उपाध्याय यांनी इंस्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिने मेहंदी लावलेली दिसत आहे. नीलमच्या हातावर सिद्धार्थच्या नावाची मेहंदी बनवण्यात आली आहे. हळदी समारंभ देखील सुरू झाला आहे, ज्यामध्ये मधु चोप्रा देखील दिसल्या आहेत.