(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
दिलजीत दोसांझ सध्या त्याच्या आगामी ‘पंजाब ९५’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. आता चित्रपटाबाबत अशी माहिती समोर आली आहे की चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यापूर्वी काही महत्त्वाचे बदल या चित्रपटामध्ये केले गेले आहेत. हा चित्रपट हनी त्रेहान यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट मानवाधिकार कार्यकर्ते जसवंत सिंग खलरा यांच्या जीवनावर आधारित आहे. याची निर्मिती रॉनी स्क्रूवाला यांनी केली आहे. निर्मात्यांनी आधी चित्रपटाचे नाव ‘घल्लुघारा’ असे ठेवले होते पण नंतर ते बदलून ‘पंजाब ९५’ असे करण्यात आले.
“आम्हाला लग्नंच करायचं नव्हतं”, आमिर सोबतच्या घटस्फोटानंतर किरण रावचा धक्कादायक खुलासा
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने दिलजीत दोसांझच्या ‘पंजाब ९५’ या चित्रपटात १२० कट करण्याची मागणी केली आहे. जेव्हा ही बातमी मथळ्यांमध्ये आली, तेव्हा जसवंत सिंग खलरा यांच्या पत्नी परमजीत कौर यांनी सीबीएफसीच्या १२० कटच्या मागणीचा निषेध केला कारण त्यांच्या पतीच्या जीवनावरील बायोपिक कुटुंबाच्या संमतीने बनवण्यात आला होता. त्यांना चित्रपट कोणत्याही बदलांशिवाय प्रदर्शित करायचा आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, ‘पंजाब ९५’ आता कोणत्याही कटशिवाय मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या वर्षी शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने (SGPC) अनेक इतिहासकारांसह ‘पंजाबी ९५’ चा अभ्यास केला. त्यानंतर एका महिन्यानंतर, समितीचे सरचिटणीस गुरचरण सिंग ग्रेवाल म्हणाले, “मी हा चित्रपट पाहिला आहे, तो कोणालाही लक्ष्य करत नाही. तो पंजाबचे सत्य स्पष्टपणे दाखवतो. हा एक हृदयद्रावक चित्रपट आहे. जेव्हा मी पाहिले तेव्हा ते पाहून मला खूप वाईट वाटले.” ते पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले.’ असे त्यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, पंजाब ९५ ही जसवंत सिंग खलरा यांची जीवनकथा आहे, ज्यांनी ९० च्या दशकात मोठ्या प्रमाणात मानवी हक्कांचे उल्लंघन उघड केले आणि न्यायासाठी आपले जीवन अर्पण केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका मुलाखतीदरम्यान, खलरा यांची मुलगी नवकिरण म्हणाली, “ही एक अशी कहाणी आहे जी जगाला दाखवली पाहिजे आणि आम्ही त्याबद्दल आभारी आहोत. आम्हाला आशा आहे की यावेळी हा चित्रपट नक्की प्रदर्शित होईल.” असे त्या म्हणाल्या. दरम्यान, कामाच्या बाबतीत, दिलजीत शेवटचा जट्ट अँड ज्युलिएट ३ मध्ये नीरू बाजवासोबत दिसला होता. आणि आता तो लवकरच ‘पंजाब ९५’ मध्ये दिसणार आहे.