(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
राज कुंद्रा यांनी आज लोहरी सणाच्या निमित्ताने त्यांच्या चित्रपटाची घोषणा केली आहे. ते आता लवकरच चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. हा एक पंजाबी चित्रपट आहे आणि त्याचे नाव ‘मेहर’ आहे. राज कुंद्रा यामध्ये चित्रपट निर्माता म्हणून काम करणार आहे आणि हा चित्रपट ते जगभरात प्रदर्शित करणार आहेत. आज, चित्रपटाच्या घोषणेसोबतच, त्यांनी चाहत्यांना त्याची पहिली झलक देखील दाखवली आहे. तसेच रिलीज डेटही जाहीर झाली आहे. त्यांचे चित्रपट निर्माता म्हणून काम पाहण्यासाठी चाहते आता उत्सुक आहेत.
ऑस्कर ट्रॉफीची एक झलक
राज कुंद्राने आज एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे आगामी चित्रपटाचा पहिला लूक शेअर केला आहे. विशेष म्हणजे व्हिडिओमध्ये ऑस्कर ट्रॉफी देखील दिसत आहे. यासोबतच अभिनेत्याने लिहिले आहे की, ‘या लोहरीला आम्ही खूप आनंदाने ‘मेहर’ची घोषणा करत आहोत. ही आपल्या सभोवतालच्या आशीर्वादांनी प्रेरित नातेसंबंध, प्रेम आणि जीवनाची कहाणी आहे. ‘मेहर’ म्हणजे आशीर्वाद, म्हणून आम्हाला आमच्या या प्रवासात तुमचे प्रेम आणि आशीर्वाद हवे आहेत. ही हृदयस्पर्शी कथा पडद्यावर आणण्याचा प्रयत्न करत असताना वाहे गुरुचे आशीर्वाद आपल्या सर्वांसोबत राहोत.’ असे लिहून त्यांनी चित्रपटाच्या पोस्टरची पहिली झलक सादर केली आहे.
शिक्षक दिनी प्रदर्शित होईल
या चित्रपटात गीता बसरा, बनिंदर बनी, सविता भाटी, आशिष दुग्गल, दीप मनदीप आणि मास्टर अगमवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाची निर्मिती दिव्या भटनागर आणि रघु खन्ना करत आहेत. हा चित्रपट यावर्षी सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. पोस्टसोबत दिलेल्या माहितीनुसार, हा चित्रपट ५ सप्टेंबर २०२५ रोजी शिक्षक दिनानिमित्त जगभरात प्रदर्शित होणार आहे. शिल्पा शेट्टीने तिच्या पतीला या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अभिनेत्रीनेही चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.
“आम्हाला लग्नंच करायचं नव्हतं”, आमिर सोबतच्या घटस्फोटानंतर किरण रावचा धक्कादायक खुलासा
वापरकर्त्यांनी अभिनंदन केले
सोशल मीडियावर शेअर केलेल्या टीझरमध्ये लिहिले आहे की, ‘जेव्हा संपूर्ण जग तुमच्यासाठी आपले दरवाजे बंद करते, तेव्हा या कठीण काळात आशेचा किरण अधिक तेजस्वीपणे चमकतो’. पोस्टरमध्ये एक पेटी ठेवली आहे आणि त्यावर एक ट्रॉफी आहे. या चित्रपटासाठी वापरकर्ते राज कुंद्राचे अभिनंदन करत आहेत. ‘मेहर’ या चित्रपटाची कथा आणि स्टारकास्ट पाहण्यासाठी चाहते आता उत्सुक आहेत.