(फोटो सौजन्य - Instagram)
भारतासाठी इतिहास रचणारी रेचल गुप्ताने आज एक मोठे पाऊल उचलले आहे. रेचल गुप्ताने एक पोस्ट शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. रेचल आता सौंदर्य स्पर्धेतून बाहेर पडताना दिसत आहे ज्यामुळे संपूर्ण जग तिला ओळखते. तिचा हा मोठा निर्णय ऐकून चाहते चकित झाले आहेत. मिस ग्रँड इंटरनॅशनल २०२४ चा किताब जिंकणाऱ्या रेचल गुप्ताने आता सोशल मीडियावर एक मोठी घोषणा केली आहे. तिने सांगितले की ती मिस ग्रँड इंटरनॅशनल २०२४ चा किताब परत करत आहे. २०२४ मध्येच रेचल गुप्ताने भारतासाठी पहिला सुवर्ण मुकुट जिंकला.
रेचल गुप्ताने मिस ग्रँड इंटरनॅशनल २०२४ चे पद सोडले
रेचलला हे किताब जिंकून एक वर्षही झाले नाही आणि ती ते परत करत असल्याचे सांगत आहे. रेचल गुप्ताने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून एक पोस्ट शेअर करून जगाला याची माहिती दिली आहे. तिने एका नोटमध्ये लिहिले आहे की, ‘ही बातमी शेअर करताना मला खूप वाईट वाटत आहे: मी मिस ग्रँड इंटरनॅशनल २०२४ च्या पदावरून पायउतार होण्याचा आणि माझा मुकुट परत करण्याचा निर्णय घेतला आहे. मुकुट मिळवणे हे माझ्या आयुष्यातील सर्वात गोड स्वप्नांपैकी एक होते आणि मी माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची आणि इतिहास घडवण्याची आशा आणि अभिमानाने भरलेली होती.’ असे तिने म्हटले आहे.
प्रसिद्ध गायक Michael Sumler यांचा कार अपघातात मृत्यू, हॉलीवूडमध्ये पसरली शोककळा
रेचल गुप्ताने केले गंभीर आरोप
रेचल गुप्ता पुढे म्हणाली की, ‘तसेच, किताब जिंकल्याणनंतरकाही महिन्यांत मला वचनभंग, गैरवापर आणि विषारी वातावरणाचा सामना करावा लागला जो मी आता शांतपणे सहन करू शकत नाही. हा निर्णय हलक्यात घेतला गेला नाही आहे. येत्या काही दिवसांत, मी या कठीण प्रवासामागील संपूर्ण तपशील सांगणारा एक व्हिडिओ रिलीज करेन. मी हे पुढचे पाऊल उचलताना तुमची करुणा, तुमचे मोकळे हृदय आणि तुमचा सतत पाठिंबा मिळाला आहे. मी विनंती करते तुमचे माझ्यावरचे प्रेम असच कायम ठेवा ते माझ्यासाठी जास्त गरजेचं आहे. ‘ असे ती म्हणाली.
काजोलचे काका Rono Mukherjee यांचे निधन, अंत्यसंस्काराला चित्रपटसृष्टीतील कलाकारांची उपस्थिती!
रेचल गुप्ता लवकरच सत्य सांगण्यासाठी एक व्हिडिओ शेअर करणार
रेचल गुप्ताने ही नोट शेअर करताना लोकांची माफीही मागितली आहे. तिने लिहिले, ‘जगभरातील माझ्या सर्व समर्थकांना: जर या बातमीने तुम्हाला निराश केले असेल, तर मी माफी मागते. कृपया समजून घ्या की हा निर्णय घेणे सोपा नव्हता, परंतु तो माझ्यासाठी योग्य आहे. सत्य लवकरच बाहेर येईल. मी तुम्हा सर्वांवर शब्दांपेक्षा जास्त प्रेम करते. माझ्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल धन्यवाद.’ आता सर्वांना जाणून घ्यायचे आहे की रेचल गुप्ता सोबत असे काय झाले आहे ज्यामुळे तिला मिस ग्रँड इंटरनॅशनल २०२४ चा किताब परत करावा लागला? आशा आहे की ती लवकरच जगाला संपूर्ण सत्य सांगेल.