(फोटो सौजन्य - Instagram)
हॉलीवूड इंडस्ट्रीमधून दुःखद बातमी समोर आली आहे. ‘कूल अँड द गँग’ गायक मायकेल समलर यांचे रस्ते अपघातात निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. मायकेलचे चाहते आणि इंडस्ट्रीतील मित्रांना चांगलाच थक्क बसला आहे. त्यांना विश्वास बसत नाही की मायकेल आता आपल्यात नाही. ‘कूल अँड द गँग’ बँडने ही माहिती दिली आहे आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आता इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.
गायकाचा अपघात कसा झाला?
मिळालेल्या माहितीनुसार, मायकेलचा मृत्यू अमेरिकेतील जॉर्जियातील मेब्लेटन येथे झाला. २५ मे रोजी संध्याकाळी तो त्याची काळी निसान कार चालवत होता आणि अचानक त्याची कार दुसऱ्या वाहनाशी धडकली. अपघात खूपच भयानक होता. यानंतर, गायकाला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
काजोलचे काका Rono Mukherjee यांचे निधन, अंत्यसंस्काराला चित्रपटसृष्टीतील कलाकारांची उपस्थिती!
मित्राने दिली माहिती
दुसऱ्या बँड सदस्याने आणि त्याचा मित्र रॉबर्ट कूल बेलने मायकेलच्या मृत्यूची माहिती दिली आणि म्हटले की हे एक कटू सत्य आहे. आपण एक भाऊ गमावला आहे. मायकेलशिवाय स्टेज पूर्वीसारखा राहणार नाही. त्याने असेही म्हटले की तो त्याच्या संपूर्ण आयुष्यात ज्या व्यवसायात होता त्यात इतर लोकांना यशस्वी होताना पाहण्याची त्याची नेहमीच इच्छा होती.
केजीएफच्या मेकर्सने हृतिक रोशनसोबत केली हातमिळवणी, ‘वॉर २’पेक्षाही करणार जबरदस्त ॲक्शन
मायकेल कोण होता?
मायकेलला संगीत उद्योगातील एक दिग्गज म्हणून पाहिले जाते. त्याला पार्टीचा प्राण म्हटले जात असे. त्याने तीन दशके ‘कूल अँड द गँग’ या बँडमध्ये गायक म्हणून काम केले. १९८५ मध्ये समलर या बँडमध्ये सामील झाला. त्यानंतर त्याने त्याच्या गँगमधील इतर गायकांनाही प्रशिक्षण दिले. त्याच्या बँडने दोन ग्रॅमी पुरस्कार, ७ अमेरिकन म्युझिक अवॉर्ड जिंकले आहेत. तसेच, त्याच्या यादीत २५ टॉप टेन आर अँड बी हिट्स, ९ टॉप टेन पॉप हिट्स आणि ३१ गोल्ड आणि प्लॅटिनम अल्बमचा समावेश आहे.