Radhika Madan
राधिका मदान ही भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात अष्टपैलू अभिनेत्रींपैकी एक आहे. अक्षय कुमार अभिनीत आणि सुधा कोंगारा दिग्दर्शित तिचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘सरफिरा’ आज थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. आणि या चित्रपटामध्ये राधिकाच्या साकारलेली “राणी” ची भूमिका ही खूप उत्तम आणि लक्षवेधी आहे. राधिका मदनच्या “राणी” सारख्या सशक्त स्त्रीच्या भूमिकेला सर्व प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे कारण तिने तिच्या भूमिकेने समीक्षक आणि प्रेक्षकांना थक्क केले आहे.
वास्तविक जीवनातील कथेवर आधारित, या चित्रपटात राधिका मदन राणीच्या भूमिकेत असून तिची भूमिका ही एक आकर्षक मराठी पात्र साकारणारी आहे. हे नाकारता येत नाही की तिने साकारलेल्या व्यक्तिरेखेमध्ये पाऊल टाकण्यापूर्वी राधिका नेहमी दिलेल्या व्यक्तिरेखेचे स्वरूप जाणून घेते आणि यावेळी तिने संपूर्ण महाराष्ट्रीयन मुलीचे पात्र हाती घेतले आणि संस्कृतीची सत्यता समोर पडद्यावर आणली आहे.
तिच्या अभिनयाचे कौतुक करताना, चित्रपट व्यापार विश्लेषक कोमल नाहटा या म्हणाल्या कीं, “सरफिरा या चित्रपटामध्ये मदनने उत्कृष्ट अभिनय केला आहे. आणि तिने यापूर्वी काही अविश्वसनीय काम केले आहे. नाहटा सांगतात, “राधिकाला तिची कलाकुसर माहीत आहे. मला तिचा सरफिरामधील अभिनय खूप आवडला होता. तिने ज्याप्रकारे चित्रपटात तिची मराठी बोली उचलली आहे त्याचे कौतुक करण्यासारखे आहे. खरं तर ती तिच्या आधीच्या चित्रपट सजनी शिंदेच्या अगदी जवळ आहे. तिची ही देखील भूमिका तितकीच चांगली होती.” असे त्यांनी सांगितले.
या चित्रपटामधील राधिकाचे कॉमिक टायमिंग अतुलनीय आहे, जे चित्रपटात हलकेपणा आणते. तिचे राणीचे पात्र विनोद, संवेदनशीलता आणि खेळकरपणाचे परिपूर्ण मिश्रण आहे. जे चाहत्यांना अनुभवायला मिळाले आहे. हे स्पष्ट आहे की तिने स्वतःला पात्रात पूर्णपणे बुडवून घेतले होते आणि त्याचे बारकावे उल्लेखनीय खोलीसह समजून घेतले होते. असे त्या पुढे म्हणाल्या.
तसेच पुढे या चित्रपटाचे निर्माते आणि चित्रपट व्यापार तज्ञ गिरीश जोहर म्हणाले की,”सरफिरामध्ये अक्षय कुमार आणि राधिका या दोघांचाही अतिशय प्रशंसनीय अभिनय होता. संपूर्ण टीमने तो उत्कृष्टपणे पार पाडला, राधिका आधीपासूनच एक लोकप्रिय चेहरा आहे आणि आता या बारीकसारीक पात्रांसह ती प्रेक्षकांच्या आणखी पसंतीस येत आहे. तिची आकर्षक पडद्यावरची उपस्थिती आणि सहजतेने साकारलेले पात्रे या सगळ्याची क्षमता राधिकामध्ये असल्यामुळे ती एक जबरदस्त अभिनेत्री बनणार आहे. या चित्रपटामध्ये अक्षय आणि राधिका या दोघांचाही जास्त समावेश आहे. त्यामुळे राधिका आता चाहत्यांची आवडती अभिनेत्री बनत आहे यात शंकाच नाही.” असे त्यांनी तिच्या बद्दल सांगितले आणि भरभरून कौतुक केले.