‘शैतान’, ‘मैदान’ आणि ‘औरों में कहां दम था’ या चित्रपटानंतर आता अभिनेता अजय देवगण या वर्षाच्या अखेरीस आगामी चित्रपट ‘सिंघम अगेन’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने यांनी केले असून, चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आत्तापर्यंत या सिनेमाशी संबंधित अनेक अपडेट्स समोर आले आहेत. यांसारख्या अपडेट्सवर दिग्दर्शकाने मौन सोडले आहे. या चित्रपटाबद्दलची सगळी माहिती चाहत्यांना दिली आहे.
यासोबतच, बऱ्याच दिवसांपासून असंही बोलले जात होते की, अजय व्यतिरिक्त या चित्रपटात इतर स्टार्स कॅमिओ रोलमध्ये दिसणार आहेत. अशा परिस्थितीत आता खुद्द दिग्दर्शक रोहितने एका मुलाखतीत सत्य सांगितले आहे.
रोहितच्या सिंघम अगेनमध्ये दिसणार मल्टीस्टारर
सिंघम दिवाळीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सिंघम आणि सिंघम रिटर्न्स नंतरचा हा या फ्रँचायझीचा तिसरा सिनेमा आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबत दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ, करीना कपूर खान, जॅकी श्रॉफ, रणवीर सिंग, अक्षय कुमार आणि अर्जुन कपूर हे देखील दिसणार आहेत. या सगळ्या कलाकारांना एकत्र स्क्रीन शेअर करताना प्रेक्षक पाहणार आहेत.
चित्रपटातील कलाकारांबद्दल रोहित काय म्हणाला?
दिग्दर्शक रोहित शेट्टी गालाटा इंडियाशी संवाद साधत या चित्रपटाशी संबंधित अनेक किस्से शेअर केले आहेत. तो म्हणाला की, “जेव्हा तुम्ही चित्रपट बनवता तेव्हा इतक्या स्टार्सला एकत्र आणणे खूप अवघड काम असते आणि माझ्यासाठीही ते अवघड होते. इतके स्टार्स एकाही चित्रपटात दिसले नाहीत. आणि आता ते या चित्रपटामध्ये काम करताना एकत्र दिसणार आहेत.” असे तो म्हणाला.
हे देखील वाचा- रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ मध्ये झळकणार दीपिका पदुकोण, महिला पोलिसांवर पहिल्यांदाच चित्रपट!
तसेच, पुढे त्याने सांगितले चित्रपटाच्या क्लायमॅक्सच्या शूटिंगदरम्यान एक विनोद सुरू होता, ज्यामध्ये असे म्हटले होते की, मुंबईत इतर कोणत्याही चित्रपटाचे शूटिंग होत नाही कारण येथे सर्व काही आहे. त्याच वेळी, सिंघम अगेनच्या दिग्दर्शकाने त्या अफवांनाही पूर्णविराम दिला जेथे असे म्हटले जात होते की काही स्टार्स फक्त कॅमिओ करत आहेत, परंतु असे नाही की ते संपूर्ण चित्रपटात आहेत. या चित्रपटात इतर स्टार्सच्या भूमिकाही जोरदार पाहायला मिळणार आहेत. आणि हा चित्रपट लवकरच नोव्हेंबर महिन्यात प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहता येणार आहे.