(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
२०१२ मध्ये आलेल्या ‘कॉकटेल’ चित्रपटाने त्याच्या कथेने, संगीताने आणि स्टारकास्टने प्रेक्षकांची मने जिंकली. आता दिग्दर्शक होमी अदजानिया त्याचा सिक्वेल घेऊन परतत आहेत, ज्यामध्ये यावेळी शाहिद कपूर, क्रिती सेनन आणि रश्मिका मंदान्ना हे कलाकार दिसणार आहेत. ‘कॉकटेल २’ बद्दल अपडेट आल्यापासून या स्टार्सचे चाहते खूप उत्सुक आहेत. तसेच ही बातमी ऐकून चाहते देखील आता खुश झाले आहेत.
शाहिद कपूरची नवी शैली
शाहिद कपूरने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले, ‘नवी सुरुवात!! कॉकटेल २’. या एका पोस्टमुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल खळबळ उडाली आहे. शाहिदने संकेत दिले आहेत की चित्रपटाचे शूटिंग आता सुरू झाले आहे. तसेच त्याने क्रिती सेनन आणि रश्मिका मंदान्ना यांचे देखील नाव लिहिले आहे.
या चित्रपटात क्रिती सेनन आणि रश्मिका मंदान्नाची एन्ट्री
क्रिती सेनन आणि रश्मिका मंदाना या चित्रपटामध्ये झळकणार आहेत. याआधीही क्रिती सेननने शाहिदसोबत स्क्रीन शेअर केली आहे. ‘तेरी बातें में ऐसा उलझा जिया’ या चित्रपटात दोघांचेही काम खूप आवडले होते. त्याचबरोबर रश्मिका मंदानाने तिच्या ताजेपणा आणि आकर्षणाने दक्षिण भारतीय तसेच हिंदी प्रेक्षकांमध्ये लोकप्रियता मिळवली आहे. तिन्ही कलाकारांचे एकत्र येणे चाहत्यांसाठी एक मजेदार गोष्ट ठरणार आहे. या तिघांचे एकत्र केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते आता उत्सुक आहेत.
९ मुलांच्या जन्मनंतर ५२ वर्षीय गायिकेचा घटस्फोट, २९ व्या Anniversary आधीच पत्नीने धक्कादायक सरप्राईज
युरोप आणि भारतात शूटिंग सुरु
हा चित्रपट भारताच्या वेगवेगळ्या भागात आणि युरोपमधील सुंदर ठिकाणी शूट केला जाणार आहे. असे मानले जाते की ‘कॉकटेल’ केवळ कथा आणि पात्रांमुळेच नव्हे तर त्याच्या शानदार पार्श्वभूमी आणि दृश्यात्मक चित्रीकरणामुळे सर्वांना आश्चर्यचकित करू शकते. वृत्तानुसार, चित्रपटाचे वेळापत्रक जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे. अलीकडेच, दिग्दर्शक होमी अदजानिया यांच्या पत्नी आणि सेलिब्रिटी स्टायलिस्ट अनैता श्रॉफ अदजानिया यांनी सोशल मीडियावर चित्रपटाच्या स्क्रिप्टची एक झलक शेअर केली, ज्यामध्ये काम चालू आहे हॅशटॅग लिहिले होते. तेव्हापासून, लोकांना या चित्रपटाच्या सुरुवातीची कल्पना आली होती. दिग्दर्शक होमी अदजानिया हा चित्रपट दिग्दर्शित करत आहेत.
कामाबद्दल बोलायचे झाले तर, शाहिद कपूर शेवटचा ‘देवा’ चित्रपटामध्ये दिसला होता आणि लवकरच तो विशाल भारद्वाजच्या ‘अर्जुन उस्तारा’मध्ये तृप्ती डिमरीसोबत दिसणार आहे. क्रिती सेनन सध्या आनंद एल राय यांच्या ‘तेरे इश्क में’मध्ये काम करत आहे, ज्यामध्ये धनुष तिच्यासोबत काम करताना दिसणार आहे. दरम्यान, आयुष्मान खुरानासोबत ‘थामा’चे शूटिंग पूर्ण केल्यानंतर रश्मिका मंदाना आता ‘कॉकटेल’मध्ये व्यस्त आहे.