(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य हे दक्षिणेतील सर्वात आवडत्या जोडप्यांपैकी एक आहेत. आज बॉलीवूड स्टार नागा चैतन्य ३९ वा वाढदिवस आहे. या खास वाढदिवसानिमित्त शोभिताने तिच्या सोशल मीडिया हँडलवर त्याच्यासोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केला. फोटोमध्ये दोघेही एकत्र खूप आनंदी दिसत आहेत, तर नागा एक संरक्षक पती असल्याचे दिसून येत आहे. तसेच आता या कपलचा फोटो सोशल मेडियाव व्हायरल होत आहे. आणि चाहते कंमेंट करून प्रतिसाद देत आहे.
गोल्डन साडीमध्ये चमकल्या अंबानी महिला, शाहरुख, रणवीरसह दिले पोझ; पाहा PHOTOS
शोभिताने शेअर केली पोस्ट
सोभिताने तिच्या पती नागाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी इंस्टाग्रामवर एक गोड फोटो शेअर केला. फोटोमध्ये नागा चैतन्य शोभिता यांच्या स्वेटरला झिप अप करताना दिसत आहेत, आणि थंडीपासून त्यांचे रक्षण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी पोस्टला कॅप्शन दिले आहे, “वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रियकर @chayakkineni.” नागाने शोभिता यांच्या पोस्टला लाल हृदयाच्या इमोजीने उत्तर दिले.
शोभिता आणि नागाचे लग्न
४ डिसेंबर २०२४ रोजी हैदराबादमधील अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाचे लग्न पारंपारिक तेलुगु समारंभात झाले. कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला. नागा आणि शोभिता यांच्या लग्नाचे अनेक व्हिडिओ आणि फोटो बऱ्याच काळापासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शोभिता आणि नागाला एकत्र पाहून चाहते देखील आनंदी झाले.
नागा चैतन्यची संपूर्ण कारकीर्द
साऊथ स्टार नागा चैतन्य शेवटचा “थंडेल” या चित्रपटात दिसला होता. आता तो पुन्हा एकदा “वृषकर्मा” नावाच्या बहुप्रतिक्षित प्रकल्प “एनसी२४” मध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट सुकुमार यांनी लिहिला आहे आणि कार्तिक दंडू यांनी दिग्दर्शित केला आहे. अभिनेत्याच्या ३९ व्या वाढदिवशी आज चित्रपटाचे पहिले पोस्टर आणि शीर्षक प्रदर्शित करण्यात आले.






