फोटो सौजन्य - Social Media
सोनमने पोस्ट करत जाहीर केले बाळाचे नाव!
अभिनेत्री सोनम कपूरने तिच्या @sonamkapoor या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये अभिनेत्रीने पिस्ता रंगाची साडी परिधान केली आहे. तसेच सारख्याच रंगाचे कपडे वायूने आणि तिच्या नव्या बाळाने परिधान केले आहेत. तिचा पती आनंद अहुजाने पांढऱ्या रंगाचे सदरा परिधान केला आहे. त्यांनी त्यांचा Family फोटो शेअर केला आहे. दरम्यान कॅप्शनमध्ये बाळाचे नाव शेअर केले आहे. सोनमच्या बाळाचे नाव आहे ‘रुद्रलोक’!
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये नमूद केले आहे की, “दैवी कृपेने पुन्हा एकदा आमचं आयुष्य आनंदाने आणि नव्या आशेने उजळून निघालं आहे. एकादशीच्या शुभ दिवशी, भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने आमच्या दुसऱ्या मुलाचा जन्म झाला. त्याचा जन्म आमच्यासाठी दैवी संकेत, कर्मबंधनाची सुंदर जुळवण आणि त्याच्या भावासोबतचं एक पवित्र नातं आहे. या अमूल्य आशीर्वादासाठी आम्ही मनापासून कृतज्ञ आहोत. प्रेम, आनंद आणि कृतज्ञतेसह आम्ही स्वागत करतो – रुद्रलोक कपूर अहुजा. वेदांमध्ये ‘रुद्र’ हा शब्द ‘रुद’ म्हणजे गर्जना करणे या धातूपासून निर्माण झाला आहे. रुद्र म्हणजे अपार सामर्थ्याचं प्रतीक, जो दुःख दूर करतो आणि वादळ, प्राण, उपचार व नवचैतन्य यामागील दैवी शक्ती मानला जातो. रुद्राचा संबंध ‘वायू’शी, म्हणजे प्रत्येक सजीवामधील प्राणशक्तीशी अतूट मानला जातो. आमच्या पहिल्या मुलाचं नाव ‘वायु’ आहे, जो जीवनाचं जतन करणाऱ्या विष्णूचं प्रतीक आहे. आता ‘रुद्र’च्या आगमनाने जणू एक पवित्र संतुलन पूर्ण झाल्यासारखं वाटत आहे. श्वास आणि शक्ती, जतन आणि परिवर्तन… एकमेकांना अधिक बळ देणारं नातं. त्याच्या नावाप्रमाणेच रुद्र निर्भय, संवेदनशील, जागरूक आणि प्रकाश व सामर्थ्याचा स्रोत बनो, हीच आमची प्रार्थना. तुमच्या प्रेम, शुभेच्छा आणि आशीर्वादांसाठी मनःपूर्वक धन्यवाद. सोनम, आनंद, वायु आणि रुद्र”
सोनमच्या चाहत्यांना तिच्या बाळाचे नाव फार आवडले आहे. बाळाच्या पुढील आयुष्यासाठी तिच्या चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत तसेच ‘रुद्रलोक कपूर-अहुजा’ या नावाचे कौतुक केले आहे.






