फोटो सौजन्य - Social Media
दक्षिण भारतीय अभिनेत्री साई पल्लवी ‘रामायण’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात ती रणबीर कपूरसोबत काम करताना दिसणार आहे. या चित्रपटात साई सीतेच्या भूमिकेत दिसणार असून रणबीर कपूर भगवान रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. नितेश तिवारी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुढील वर्षी जानेवारीमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.
शूटिंगपूर्वी मंदिरात पोहचली अभिनेत्री
‘रामायण’ चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्यापूर्वी अभिनेत्री साई पल्लवी वाराणसीला पोहोचली आहे, तिने काशी विश्वनाथ मंदिराला भेट दिली. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या तिच्या फोटोमध्ये ती काशीमध्ये माँ अन्नपूर्णेचे दर्शन घेताना दिसत आहे. अभिनेत्रीच्या कुटुंबातील सदस्यांचाही या फोटोंमध्ये समावेश आहे. साई पल्लवी पूर्णपणे भक्तीत रमलेली दिसत आहे. तिचे हे सुंदर फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Sourh actress sai pallavi on kashi annpurna temple pic.twitter.com/bgWUp04XMf — Kashi Annapurna Temple (@kshiannapurna) December 23, 2024
माँ अन्नपूर्णा देवीचा प्रसाद घेतला
साई पल्लवीने आई अन्नपूर्णा समोर बसून प्रार्थना केली. यानंतर मंदिराच्या पंडितजींनी त्यांना माँ अन्नपूर्णाचा प्रसाद दिला. ‘रामायण’ चित्रपटातील सीतेच्या भूमिकेसाठी अभिनेत्री साई पल्लवीने खूप मेहनत घेतली आहे. तिला ही भूमिका उत्तम प्रकारे साकारायची आहे. अभिनेत्रीचा हा उत्कृष्ट चित्रपट पाहण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक आहेत.
नितेश तिवारी यांनी ‘रामायण’ ची रिलीज डेट केली जाहीर
दिग्दर्शक नितेश तिवारी, निर्माते नमित मल्होत्रा यांनी इन्स्टाग्रामवर चित्रपटाचा पहिला पोस्टर शेअर करून चाहत्यांची उत्सुकता अधिक ताणली होती. चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना दिग्दर्शक म्हणतात, “हे महाकाव्य एका दशकापूर्वी रुपेरी पडद्यावर आणण्यासाठी मी पुढाकार घेतला होता. आज त्या छोट्याच्या गोष्टीचा चित्रपटात रुपांतर झाल्याने मला फार आनंद होत आहे. आपला इतिहास आणि त्यातील सत्यता आणि आपली संस्कृती… जगभरातील लोकांपर्यंत पोहोचवणे हेच आमचे एक उद्दिष्ट आहे.” निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी रामायण चित्रपटाचे एक नाही तर दोन भाग येणार आहे अस जाहीर केलं आहे. हे प्रेक्षकांसाठी मोठं सरप्राईज असल्याचं मानलं जात आहे. या रामायण चित्रपटाचा पहिला भाग २०२६ च्या दिवाळीत दुसरा भाग २०२७ च्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे.